रात्र अधिक सुंदर बनवण्यासाठी दिशा पटानी करते 'या' गोष्टी, समोर आले तिचे बेडरूम सीक्रेट्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:50 IST2019-12-05T17:46:42+5:302019-12-05T17:50:54+5:30
सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

रात्र अधिक सुंदर बनवण्यासाठी दिशा पटानी करते 'या' गोष्टी, समोर आले तिचे बेडरूम सीक्रेट्स !
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आणखी काय. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे. बॉलिवूड सिनेमापेक्षा खाजगी कारणामुळेच जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री दिशा पटानीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खळबळ माजवली आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असून आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत चर्चेत राहायला तिला आवडते. काही दिवसांपूर्वीच बिकीनीतील मोनोक्रोम लूकमुळे चर्चेत आली होती. यानंतरच आता तिने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे बेडरूममधील रहस्य सांगितले आहेत. प्रत्येक दिवसाची रात्र ही पहिल्या रात्री प्रमाणेच भासावी यासाठी 'जस्ट अस' कलेक्शन हे माझे बेडरूम सिक्रेटस आहेत.
दिशा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये तिच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टींचे खुलासे करताना दिसते. तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरमधील स्ट्रगलविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने अर्ध्यावरच शिक्षण सोडल्याचं स्पष्ट केलं. “शिक्षण अर्धवट सोडून मी मुंबईत आली. कोणत्याही ओळखीशिवाय एका नवीन शहरात येऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही. मी एकटीच राहत होती आणि स्वत:च्या खर्चासाठी कधीच कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाही. फक्त ५०० रुपये घेऊन मी मुंबईत आली होती आणि एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते.
जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी मी खूप फिरले. काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ याचा सतत ताण माझ्यावर होता,”असं तिने सांगितलं. सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला वाहवा मिळाली. टायगरसोबत तिच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा रंगत असते.