गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 15:20 IST2021-02-01T15:19:10+5:302021-02-01T15:20:58+5:30

दीपिका पादुकोणचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय.

actress deepika padukone shares good news of pregnancy with this photo or just welcomes february | गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

ठळक मुद्देदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे एकमेकांना 6 वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. केवळ व्हायरलच नाही तर हा फोटो पाहिल्यानंतर गुड न्यूज का? म्हणत सोशल मीडियाने नुसता कहर केला आहे. होय, दीपिकाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि या फोटोनंतर दीपिका आई होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
या फोटोमध्ये दीपिका साईड पोज देताना दिसतेय. मान खाली घालून मनातल्या मनात हसतेय. कॅप्शनमध्ये दीपिकाने केवळ ‘फेब्रुवारी’ असा एक शब्द लिहिला आहे. या फोटोनंतर का कुणास ठाऊक दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु झाली.

दीपिकाकडे गुडन्यूज असल्याचा अंदाज नेटक-यांनी वर्तवला. एखादी प्रेग्नंट महिला बेबी बम्पसोबत पोज देते, अगदी तशीच पोज दीपिकाने दिल्याने हा फोटो म्हणजे, डीपीच्या प्रेग्नंसीचा संकेत असल्याचे चाहते मानत आहेत.
 अद्याप दीपिकाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण नेटक-यांचे तर्कवितर्क थांबण्याची चिन्हे नाहीत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे एकमेकांना 6 वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे.

Web Title: actress deepika padukone shares good news of pregnancy with this photo or just welcomes february