बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:30 IST2020-02-07T16:29:57+5:302020-02-07T16:30:25+5:30

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

actress Deepika Padukone created this history, surpassing all the Bollywood celebrities | बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास


दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या बाजीराव मस्तानी, पद्मावत, गलियों की रासलीला-रामलीला, ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तिच्या छपाक या चित्रपटाला देखील समीक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणानुसार, दीपिका पादुकोण २०१९ ची भारतातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटी ब्रँडच्या रूपात समोर आली असून वैश्विक आयकॉनच्या या ब्रँडचे मूल्य ९३.५ मिलियन डॉलर आहे, जे अन्य सेलेब्रिटींच्या तुलनेत सर्वात अधिक आहे.

एवढेच नाही, तर टॉप २० च्या सूचीमध्ये दीपिका देशातील सर्वात प्रसिद्ध सेलेब्रिटींमधील एक आहे. त्यानंतर, सुपरस्टार शाहरुख खान ६६ मिलियन डॉलर आणि सलमान खान ५५.७ मिलियन डॉलरवर आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर आलिया भट्ट यांचा देखील या यादीत समावेश असून प्रियंका चोप्रा, आयुषमान खुराना, करीना कपूर, अनुष्का शर्मासारख्या सेलिब्रिटींनी देखील या यादीत जागा पटकावली आहे, मात्र दीपिका या सगळ्यांमध्ये आघाडीवर आहे.

या अभ्यासानुसार ब्रँड मूल्यांच्या आधारावर भारतातील सर्वात शक्तिशाली सेलिब्रिटी ब्रँडची रॅकिंग प्रदान करण्यात आली असून यामध्ये दीपिका यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. सर्वात जास्त सोशल मीडिया फॉलोइंग आणि चाहत्यांचे प्रेम यासोबत, दीपिका सर्वात अधिक आवडती अभिनेत्री असून या तिच्या ब्रँड इंडोर्समेंटने तिला अधिक प्रशंसित बनवले आहे.

दीपिका प्रमुख स्थापित ब्रँड आणि नव्या ब्रँडचा चेहरा असून येत्या काळातील अनेक संधींचे ती नेतृत्व करेल.

Web Title: actress Deepika Padukone created this history, surpassing all the Bollywood celebrities