अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, डोक्याला पडले १३ टाके, हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:49 IST2025-03-13T14:48:52+5:302025-03-13T14:49:11+5:30

भाग्यश्रीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

Actress Bhagyashree gets injured while playing pickleball 13 stitches on her head hospital photo | अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, डोक्याला पडले १३ टाके, हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते चिंतेत

अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, डोक्याला पडले १३ टाके, हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते चिंतेत

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी सलमान खानची हिरोईन भाग्यश्रीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आजही भाग्यश्री तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसते. मैने प्यार कियामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या भाग्यश्रीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. भाग्यश्रीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

भाग्यश्रीच्या डोक्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. पिकलबॉल खेळताना भाग्यश्रीच्या डोक्याला खोच पडली आहे. यामुळे अभिनेत्रीच्या डोक्याला १३ टाके पडले आहेत. भाग्यश्रीच्या डोक्याला दुखापत झाल्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्रीच्या डोक्यावर छोटीशी सर्जरी करण्यात आली आहे. अभिनेत्रीचे हॉस्पिटलमधले फोटो विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते चिंतेत आहेत. 


दरम्यान, भाग्यश्रीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मैने प्यार किया या सिनेमात ती सलमान खानसोबत झळकली होती. पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. आजही भाग्यश्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: Actress Bhagyashree gets injured while playing pickleball 13 stitches on her head hospital photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.