टीव्ही अभिनेत्रीने केली एक्स-बॉयफ्रेन्डची हत्या; डोक्यात घातला हातोडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 10:28 IST2020-01-01T10:27:26+5:302020-01-01T10:28:37+5:30

तामिळनाडूच्या चेन्नईत हत्येचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.

Actress beats ex-boyfriend to death in Tamil Nadu | टीव्ही अभिनेत्रीने केली एक्स-बॉयफ्रेन्डची हत्या; डोक्यात घातला हातोडा 

टीव्ही अभिनेत्रीने केली एक्स-बॉयफ्रेन्डची हत्या; डोक्यात घातला हातोडा 

ठळक मुद्देदेवी ही टीव्ही मालिकांमध्ये किरकोळ काम करत होती. तर रवी हा चित्रपटांत टेक्निशियन म्हणूप काम करायचा.

तामिळनाडूच्या चेन्नईत हत्येचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. 42 वर्षांची एक टीव्ही अभिनेत्री या हत्येतील आरोपी असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. या टीव्ही अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा यात मृत्यू झाला. या अभिनेत्रीचे नाव एस. देवी आहे.
 या घटनेत रवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर देवीने खुद्द पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपला गुन्हा कबूल केला.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 8 वर्षांपूर्वी देवी व रवीची ओळख झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. देवी आधीच विवाहित होती. दोन वर्षांपूर्वी देवीच्या पतीला या अफेअरबद्दल कळले. यानंतर नव-याने देवीला रवीपासून दूर राहण्यास बजावले. त्याने देवीला शिवणकामाची मशीन घेऊन दिली आणि  देवीने अभिनयाबरोबरच टेलरिंगचे कामही सुरू केले. देवीचा पती फर्निचरचे दुकान चालवतो. पण रवीला देवीचा विरह सहन झाला नाही. त्याने देवीचा शोध सुरु केला आणि तिच्याबद्दल माहिती मिळवली.

रविवारी मध्यरात्रीनंतर रवी देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी पोहोचला आणि लक्ष्मीला पुन्हा सोबत येण्याचा आग्रह धरला. लक्ष्मीने देवीला बोलावले. त्यानंतर देवी आणि तिचा नवरा तिथे पोहोचले. देवीला पाहून रवीने पुन्हा तिला आपल्या सोबत चालण्यासाठी आग्रह केले. यावरून भांडण सुरू झाले.  याच दरम्यान रागाच्या भरात देवीने हातोड्याने रवीचे डोके फोडले. रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्वत: देवीने राजामंगलम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान या गुन्ह्यामध्ये देवीसोबत तिचा पती बी. व्ही. शंकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
देवी ही टीव्ही मालिकांमध्ये किरकोळ काम करत होती. तर रवी हा चित्रपटांत टेक्निशियन म्हणूप काम करायचा.

Web Title: Actress beats ex-boyfriend to death in Tamil Nadu