अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन, पतीने सोशल मीडियातून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 16:02 IST2018-07-04T16:00:09+5:302018-07-04T16:02:39+5:30

पत्नी, आई आणि 7 महिन्यांच्या गर्भवती बहिणीला फोनवरुन धमक्या मिळत असल्याचे सांगितले. 

Actress Ayesha Takia receives threatening calls husband Farhan Azmi seeks police help | अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन, पतीने सोशल मीडियातून दिली माहिती

अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन, पतीने सोशल मीडियातून दिली माहिती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकियाला फोनवरुन धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. आएशाचा पती फरहान आझमी याने याबाबत एक ट्विट केलं असून त्याची पत्नी, आई आणि 7 महिन्यांच्या गर्भवती बहिणीला फोनवरुन धमक्या मिळत असल्याचे त्याने सांगितले. 

फरहान याने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई पोलीसचे डिसीपी दहीया यांनी त्याच्या फोनला किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. फरहानने हेही सांगितले की, त्यांचे बॅंक अकाऊंटही फ्रिज झाले आहेत. 


फरहान याने सांगितलं की, एका केसशी निगडीत व्यक्तीकडून या धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, फरहानवर त्याचा माजी बिझनेस पार्टनर काशिफ खान याने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. काशिफने फरहान विरोधात बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एआयआर दाखल केला होता. फरहान याने काल रात्री या धमक्यांना वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना पोस्टमध्ये टॅग करत त्यांच्या मदतीची मागणी केली आहे. 

Web Title: Actress Ayesha Takia receives threatening calls husband Farhan Azmi seeks police help