'कुणी सांगेल का, इथं बाप कोण आहे?', मुलाचा क्युट फोटो शेअर करून आरजे अनमोलने विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:45 IST2021-04-29T16:28:43+5:302021-04-29T16:45:47+5:30
अमृता रावने 1 नोव्हेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला.

'कुणी सांगेल का, इथं बाप कोण आहे?', मुलाचा क्युट फोटो शेअर करून आरजे अनमोलने विचारला प्रश्न
एकामागून एक अनेक हिट चित्रपटांत काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने सध्या आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आहे. तिने रेडीओ जॉकी अनमोलशी लग्न केले आणि दोघांना १ नोव्हेंबर २०२० रोजी पुत्रलाभ झाला. त्यानंतर दोघेही सोशल मीडियावर क्यूट आणि गोंडस व्हिडिओ-फोटो शेअर करत आहेत. अमृताने आपल्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे.अमृताचे चाहते तिला तिच्या मुलाबद्दलही वेगवेगळे प्रश्न विचारत असतात.
आरजे अनमोल बर्याचदा फोटो पोस्ट करतो. अनमोलने आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत वीर पण आहे. अनमोलनेही हा फोटो पोस्ट करताना वेगळे कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले, 'जेव्हा मी कार चालवितो तेव्हा कोणतरी माझ्यावर बारीक नजर ठेवून असते. कोणी सांगेल इथे वडील कोण आहे?'
फोटोत आपल्याला दिसू शकते की अमृता राव गाडीच्या पुढच्या सीटवर बसली आहे आणि तिने आपला मुलगा वीर आपल्या कुशीत घेतले आहे. फोटोमध्ये अमृताचा चेहरा दिसत नाही, तर अनमोल ड्राईव्हिंग सीटवर बसला आहे आणि फोटो पाहताना कळते की त्याने हा फोटो स्वतः क्लिक केला आहे. त्यात वीर आपल्या वडिलांकडे पहातो आहे अनमलने आपल्या मुलाचा परफेक्ट शॉट क्लिक केला आहे.
फोटो पाहिल्यानंतर अमृताच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट् केल्या आहे. एका युझर ने लिहिले, 'खूप गोंडस बाळ आहे.' तर एका युझर ने लिहिले, 'तुझे वडील गाडी खूप हळू चालवतात.'