विनोद खन्नांनी दिलेली ऑफर नाकारली, 'हिमालय पूत्र' मध्ये अक्षय खन्नासोबत झळकली असती 'ही' अभिनेत्री, आता म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:55 IST2025-12-24T14:52:27+5:302025-12-24T14:55:09+5:30
'धुरंधर' फेम अक्षय खन्नासोबत डेब्यू सिनेमात दिसली असती पण...; 'या' अभिनेत्रीने नाकारलेली विनोद खन्नांची ऑफर, म्हणते-" तेव्हा मी..."

विनोद खन्नांनी दिलेली ऑफर नाकारली, 'हिमालय पूत्र' मध्ये अक्षय खन्नासोबत झळकली असती 'ही' अभिनेत्री, आता म्हणते...
Akshaye Khanna : यंदाचं वर्ष हे बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी अगदीच खास ठरलं. या वर्षात एकापेक्षा एक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामधीलच एक नाव म्हणजे धुरंधर. सध्या सिनेजगतात आणि प्रेक्षकांमध्ये आदित्य धरच्या धुरंधरची सिनेमाची भलतीच क्रेझ पाहायला मिळतेय. या स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमात रणवीर सिंग , अक्षय खन्ना असे मातब्बर कलाकार झळकले आहेत.या चित्रपटात अक्षय खन्नाने रेहमान डकैतची भूमिका ज्या पद्धतीने साकारली आहे, त्याबद्दल त्याची प्रचंड कौतुक होत आहे. यादरम्यान, अक्षयच्या बाबतीत अनेक गोष्टी समोर येत आहेत.
एकेकाळचा बॉलिवूडचा हा चॉकलेट बॉय मागील काही वर्षांपासून चांगलाच चर्चेत येत आहे. अक्षय खन्नाने त्याच्या करिअरमध्ये अनेक नावाजलेल्या नायिकांसोबत काम केलं आहे. मात्र,बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिने करिअरच्या पहिल्याच सिनेमात अक्षय खन्नासोबत काम करण्याची ऑफर नाकारली होती. मात्र, या निर्णयाचा तिल आजही पश्चाताप होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमिषा पटेल आहे. अलिकडेच एका मुलाखतीत, तिने आपल्या कारकिर्दीशी संबंधित काही किस्से सांगितले, ज्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले.अमीषाने खुलासा केला की, एक काळ असा होता जेव्हा तिने अक्षय खन्नासोबत काम करण्याची संधी नाकारली होती, पण नंतर नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली.
'या' कारणामुळे अभिनेत्रीने दिलेला नकार
अक्षय खन्नाने हिमालय पूत्र या सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या सिनेमासाठी विनोद खन्ना यांनी अमिषाच्या पालकांकडे संपर्क साधला होता. कारण, त्यांना या सिनेमात मुख्य भूमिकेत अमिषाला पाहायचं होतं. पण, अमिषाने ही ऑफर नाकारली. कारण, तिला या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा ती अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होती. तो किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली,"मी तेव्हा खूप लहान होते आणि मला चित्रपटांमध्ये फारसा रस नव्हता. माझं संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर आणि पुस्तकांवर होतं. मी एक अभ्यासू मुलगी होते, त्यामुळं माझ्या पालकांनी आणि मी अभ्यासाला प्राधान्य देत तो चित्रपट नाकारला," असं अमिषा पटेलने सांगितलं.
अभिनेत्याचं कौतुक करत म्हणाली...
"अक्षय रातोरात स्टार झाला असे म्हणणारे लोक चुकीचे आहेत. हे इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, जे आता सर्वांना दिसत आहे. त्याच्या यशाबद्दल मला खूप आनंद होत आहे." असे कौतुकोद्गार देखील अभिनेत्रीने काढले आहेत.