बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:16 PM2022-02-22T22:16:30+5:302022-02-22T22:20:01+5:30

काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिने नाव न घेता अभिनेत्री आलिया भटवर निशाणा साधला होता.

Actress Alia Bhatt has also responded to the criticism of actress Kangana Ranaut | बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhat) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. आलियाच्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक होतंय.  आलियाने यात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अजय देवगणही  (Ajay Devgan)  आहे. त्याने यात गँगस्टर करीमलालाचं पात्र जिवंत केलं आहे. साहजिकच हा सिनेमा पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. 

काही दिवसांपूर्वी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिने नाव न घेता अभिनेत्री आलिया भटवर निशाणा साधला होता. गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा दणकून आपटणार आहे. कारण लीड रोलसाठी अभिनेत्रीची निवडच चुकली आहे, अशा शब्दांत कंगनाने आलियाचं नाव न घेता टीका केली होती.  एक पापा (मुव्ही माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे)  रॉमकॉग बिंबो अ‍ॅक्टिंगही करू शकते, हे पापाला सिद्ध करायचं आहे, असा टोलाही कंगनाने इन्स्टास्टोरीद्वारे लगावला होता. 

कंगनाच्या या टीकेला आता आलिया भटने देखील उत्तर दिलं आहे. आलिया भट्ट तिच्या चित्रपटातील ‘मेरी जान’गाणे लाँच करण्यासाठी कोलकात्यात होती. यातच कंगना रणौतच्या टीकेला आलिया भट्टने उत्तर दिले. पीटीआयच्या वृत्तानुसार, भगवान कृष्णाने गीतेत म्हटले होते की निष्क्रियता ही एक क्रिया आहे. बस्स मला एवढेच सांगायचे आहे, असे आलियाने म्हटले आहे. त्यामुळे आता आलियाच्या या उत्तरला कंगना प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, 

 200 कोटी खाक होणार-

इन्स्टास्टोरीवर कंगनाने दोन पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं की,या शुक्रवारी बॉक्स बॉक्स ऑफिसवर 200 कोटी खाक होणार. एक पापा (मुव्ही माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे)  रॉमकॉग बिंबो अ‍ॅक्टिंगही करू शकते, हे पापाला सिद्ध करायचं आहे. या चित्रपटातील सर्वात मोठी चूक म्हणजे, कास्टिंगच चुकलंय. पण हे नाहीच सुधारणार. अशात प्रेक्षक साऊथ व हॉलिवूड सिनेमाकडे वळत असतील तर  आश्चर्य वाटायला नको. जोपर्यंत मुव्ही माफिया पॉवरमध्ये आहेत, तोपर्यंत बॉलिवूडच्या नशीबात हेच असणार, असं पहिल्या स्टोरीत कंगनाने लिहिलं होतं.

लोकांनी यांना पाहणं बंद केलं पाहिजे-

दुसऱ्या स्टोरीमध्ये ती लिहिते, बॉलिवूड माफिया डॅडी पापा ज्याने एकट्यानेच फिल्म इंडस्ट्रीची संस्कृती बदलवून ठेवली. त्याने अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत चतुराईने गेम खेळत सुमार प्रॉडक्टला त्यांच्या माथी मारलं. या चित्रपटाच्या रिलीजनंतर याचं आणखी एक उदाहरण समोर येईल. लोकांनी यांना पाहणं बंद केलं पाहिजे. या शुक्रवारी एक मोठा हिरो आणि एक महान दिग्दर्शक त्याच्या डावपेचाला बळी पडलेले असतील, असं कंगनाने म्हटलं होतं.

Web Title: Actress Alia Bhatt has also responded to the criticism of actress Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.