सुष्मिता सेनसोबत जाहिरातीमध्ये झळकलेला अभिनेत्याने 27 वर्षानंतर केला तिच्याबद्दल खुलासा, वाचा काय म्हणाला रोहित रॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:40 IST2021-06-16T16:37:09+5:302021-06-16T16:40:49+5:30
सुष्मिता देखील तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. रोहन शॉलसोबत ती नात्यात असलेच्या जाहीर केले होते. दोघांचे नाते जगासमोर आल्यानंतर बिनधास्त दोघेही एकमेकांवर असेलल्या प्रेमाची कबुली देत असतात.

सुष्मिता सेनसोबत जाहिरातीमध्ये झळकलेला अभिनेत्याने 27 वर्षानंतर केला तिच्याबद्दल खुलासा, वाचा काय म्हणाला रोहित रॉय
अभिनेता रोहित रॉयने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवलं आहे. फारसा चर्चेत नसला त्याच्या काही प्रोजेक्टच्या निमित्ताने अधूनमधून तोही चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर रोहित प्रचंड सक्रीय असतो. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.सुष्मिता सेनसोबतचा जुना व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.
व्हिडीओ शेअर करत रोहितने जुन्या आठवणींना ऊजाळा दिला आहे. 1994 मध्ये सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स' चा किताब पटकावला होता. त्यानंतर एका जाहीरातीमध्ये ती झळकली होती. सुष्मितासोबत जाहीरातीमध्ये झळकलेला अभिनेता होता रोहित रॉय.दोघांची जोडी जाहीरातीमुळे समोर आली होती.
त्याचवेळचा एक फोटो रोहितने शेअर करत त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्याने म्हटले आहे की, सुशसोबतची माझी पहिली व्यावसायिक जाहिरात होती. अनेकांना वाटायचे की मी सुष्मिताचा प्रियकरच आहे. त्यावेळी मी सुद्धा खूप चांगला अभिनेता असल्याचे त्याने म्हटले आहे.
सुष्मिता देखील तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. रोहन शॉलसोबत ती नात्यात असलेच्या जाहीर केले होते. दोघांचे नाते जगासमोर आल्यानंतर बिनधास्त दोघेही एकमेकांवर असेलल्या प्रेमाची कबुली देत असतात. दोघेही रिने आणि अलिशाला सांभाळत आहेत. हे चौघं नेहमीच धमाल करताना दिसतात.
सुष्मिता सेन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे ती नेहमी बॉयफ्रेंड रोहमनसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहत्यांना नेहमीच या दोघांच्या लग्नाची उत्सुकता असते. लग्नावर अजुनतरी सुष्मिताने कोणत्याही प्रकारची माहिती चाहत्यांना दिलेली नाही.