६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:19 IST2021-05-19T18:18:39+5:302021-05-19T18:19:31+5:30
मनोज वाजपेयीची बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅन २च्या ट्रेलरमधील एक विशेष बाब समोर आली आहे, जी पाहून चाहते भावूक झाले आहेत.

६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल
मनोज वाजपेयीची बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅन २चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र ट्रेलरबद्दल अजून एक विशेष बाब समोर आली आहे, जी पाहून चाहते भावूक झाले आहेत. या ट्रेलरमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याने सहा महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. हा अभिनेता म्हणजे आसिफ बसरा.
अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या द फॅमिली मॅन २ या सीरिजची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यावर सर्वांचे लक्ष अभिनेता आसिफ बसराने वेधले आहे. कारण आसिफने ६ महिन्यांपूर्वीचं आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. त्याच्या निधनानंतर त्याची ही झलक पाहून चाहते सुद्धा भावुक झाले आहेत.
आसिफ बसराने आपल्या कुत्र्याच्या पट्याने गळफास लावून घेतला होता. आसिफ हे आपल्या एका परदेशी मैत्रिणीसोबत राहत होता. त्याच्या या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाजात आसिफ डिप्रेशनशी लढा देत असल्याचे म्हटले होते.
आसिफ बसरा टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. परजानियां, ब्लॅक फ्राईडे या सिनेमात त्याने काम केले होते. हॉलिवूड सिनेमा ‘आऊटसोर्स’मध्येही तो दिसला होता. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. इमरान हाश्मीच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात त्याने इमरानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. द फॅमिली मॅन २ हा त्यांचा शेवटचाच प्रोजेक्ट ठरला.