पहिल्याच चित्रपटातून अभिनेता विवेक मुशरान बनला होता सुपरस्टार, आता करतोय हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 14:42 IST2021-01-23T14:42:04+5:302021-01-23T14:42:04+5:30
२८ वर्षांपूर्वी विवेकने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

पहिल्याच चित्रपटातून अभिनेता विवेक मुशरान बनला होता सुपरस्टार, आता करतोय हे काम
एका सिनेमाने स्टार झालेत आणि तितक्याच अचानकपणे फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेले अनेक स्टार्स आहेत. असाच एक स्टार म्हणजे विवेक मुशरान. ‘सौदागर’ चित्रपटातील तोच तो चॉकलेटी हिरो. २८ वर्षांपूर्वी विवेकने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत आणि या हिरोवर साईड रोल करण्याची वेळ आली.
‘सौदागर’ चित्रपटात विवेक आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रीत ‘ईलू ईलू’ हे गाणे सुपरडुपर हिट झाले होते. पण या चित्रपटानंतर त्याच्या आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली की, त्याला काम मिळणे कठीण झाले.
‘सौदागर’ सुपरहिट झाल्यानंतर विवेकने एका वर्षांत तीन-तीन चित्रपट केलेत. पण या चित्रपटांना ‘सौदागर’सारखे यश मिळू शकले नाही आणि विवेकचे स्टारडम धोक्यात आले आणि यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला.
२००० मध्ये ‘अंजाने’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण तोही फ्लॉप ठरला. यानंतर तो तमाशा, पिंक, बेगम जान, वीरे दी वेडिंग या चित्रपटात झळकला. पण त्याच्या वाट्याला अगदीच छोट्या भूमिका आल्या. चित्रपट फ्लॉप होऊ लागल्यानंतर विवेकने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. सोनपरी, परवरिश, निशा और उसके कजिन्स या मालिकेत त्याने काम केले. नुकताच तो वूटवरील मर्जी या वेबसीरिजमध्ये झळकला.