तमराज किलवीशची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार धमाका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:30 IST2018-08-07T15:10:08+5:302018-08-07T15:30:49+5:30

आता याच तमराज किलवीश म्हणजेच अभिनेते सुरेंद्र पाल यांची मुलगी रिचा पनाई चर्चेत आहे. सोशल मीडियात सतत तिच्या खास फोटोंची चर्चां रंगलेली असते.

Actor Surendra Pal daughter Richa Panai will be the next sensation in bollywood | तमराज किलवीशची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार धमाका?

तमराज किलवीशची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार धमाका?

'शक्तीमान' ही मालिका अजूनही अनेकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. यातील एक खास भूमिका म्हणजे तमराज किलवीशची भूमिका. ही भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती. त्यावेळी या भूमिकेची प्रेक्षकांना चीड यायची इतकी ही भूमिका त्यांना प्रभावी साकारली होती. 

आता याच तमराज किलवीश म्हणजेच अभिनेते सुरेंद्र पाल यांची मुलगी रिचा पनाई चर्चेत आहे. सोशल मीडियात सतत तिच्या खास फोटोंची चर्चां रंगलेली असते. रिचा ही अभिनेत्री आणि एअऱ होस्टेस आहे. ती लखनौमध्ये लहानाची मोठी झाली. इतकेच नाही तर रिचाने काही मल्याळम आणि तमिळ सिमेमातही काम केलं आहे. रिचाला मिस लखनौ हा किताबही मिळाला होता. 

रिचा ही सोशल मीडियात चांगलीच अॅक्टीव्ह असून तिचे काही खास हॉट फोटो शेअर करत असते. पण आता ती बॉलिवूडमध्ये कधी एन्ट्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण सध्या वेगवेगळे स्टार्स किड बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. आणि रिचा ही कोणत्याही स्टार किडपेक्षा जराही कमी नाहीये. 

सध्या रिचाला कोणताही बॉलिवूड सिनेमा ऑफर झाला नसला तरी ती लवकरच बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Web Title: Actor Surendra Pal daughter Richa Panai will be the next sensation in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.