अभिनेता सोनू सूद ह्या सिनेमासाठी गिरवतोय मराठी भाषेचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 06:00 IST2018-08-08T14:29:13+5:302018-08-09T06:00:00+5:30

अभिनेता सोनू सूद रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा 'सिंबा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Actor Sonu Sood take marathi lesson for his upcoming movie | अभिनेता सोनू सूद ह्या सिनेमासाठी गिरवतोय मराठी भाषेचे धडे

अभिनेता सोनू सूद ह्या सिनेमासाठी गिरवतोय मराठी भाषेचे धडे

ठळक मुद्दे 'सिंबा' सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी सोनू उत्सुक 'सिंबा' सिनेमात सोनूचा मराठी अंदाज

अभिनेता सोनू सूद जे.पी. दत्ता यांचा आगामी चित्रपट 'पलटन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानंतर सोनू रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा 'सिंबा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमात सोनू मराठी डायलॉग बोलताना दिसणार असून यासाठी सध्या तो मराठी भाषेचे धडे गिरवितो आहे. तो पहिल्यांदाच मराठीत बोलताना दिसणार आहे. 

'सिंबा'मधील भूमिकेसाठी मराठीचे उच्चार स्पष्ट बोलता यावे यासाठी त्याने मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे ठरविले. त्यासाठी तो मराठी भाषेचा प्रशिक्षकाकडून मराठी भाषेवर काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनूने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आहे. तमीळ, तेलगू व कन्नड भाषेचे धडे घेतले आहेत. आता मराठी भाषेचे धडे घेण्यासाठी त्याने प्रशिक्षक नेमला आहे. तसेच तो महाराष्ट्रीयन क्रुसोबत मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सोनूला मराठी येत नव्हती म्हणून त्याने मराठी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. आता तो 'सिंबा'च्या सेटवर रमेश पवार यांच्याकडून मराठी भाषा शिकतो आहे. त्यांच्याकडून तो मराठी भाषेचे बारकावे शिकतो आहे. 
सोनू म्हणाला की, 'सिंबा'मधील माझी भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी मराठी संवाद बोलताना दिसणार आहे. त्यासाठी माझे उच्चार व हावभाव नीट झाले पाहिजेत. म्हणजे माझी भूमिका प्रेक्षकांना जास्त जवळची वाटेल. यापूर्वी मी तमीळ व तेलगू भाषा शिकलो आहे आणि आता सिंबासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण घेतो आहे.
'सिंबा' चित्रपटात रणवीर सिंग व सोनू सूद व्यतिरिक्त सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दिसणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. 

Web Title: Actor Sonu Sood take marathi lesson for his upcoming movie