'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:11 PM2023-07-30T12:11:14+5:302023-07-30T12:12:17+5:30

Gully boy: प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये या अभिनेत्याने याविषयी खुलासा केला आहे.

actor siddharth menon was about to-play-mc-sher-character-in-ranveer-singh-starrer-gully-boy | 'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका

'गली बॉय'साठी 'हा' मराठी अभिनेता होता पहिली पसंती; एका कारणामुळे हातून गेली एमसी शेरची भूमिका

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) याची मुख्य भूमिका असलेला 'गली बॉय' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमात सिद्धार्थ चतुर्वेदी (siddharth chaturvedi) , आलिया भट्ट (alia bhatt) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विशेष म्हणजे या सिनेमातील एका भूमिकेसाठी पोश्टर गर्ल फेम अभिनेत्याची निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव त्याला ही भूमिका करता आली नाही. प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये या अभिनेत्याने याविषयी खुलासा केला आहे.
 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सिद्धार्थ मेनन (siddharth menon) याने त्याला गली बॉय सिनेमात एक मुख्य भूमिकेची ऑफर मिळाल्याचं म्हटलं आहे. परंतु, काही गोष्टी जुळून न आल्यामुळे त्याला ही भूमिका करता आली नाही.

'गली बॉय' (Gully boy) सिनेमातील एमसी शेर या भूमिकेसाठी प्रथम सिद्धार्थ मेननला विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती भूमिका सिद्धार्थ चतुर्वेदीला मिळाली. तुला गली बॉय सिनेमातील एमसी शेर या भूमिकेसाठी ऑफर मिळाली होती हे खरं आहे का? असा प्रश्न सिद्धार्थ मेननला विचारण्यात आला होता. त्यावर, “हो, मला त्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, त्यावेळी निर्मात्यांना त्या चित्रपटातील मुराद या पात्रासोबतच एमसी शेर हे पात्र वयाने लहान पण रॅप विश्वातील मोठी व्यक्ती अशा पठडीतलं हवं होतं. नंतर या पात्राकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा बदलल्या. या अपेक्षांमध्ये मी फिट बसणारा नव्हतो. त्यामुळे ती भूमिका मला मिळाली नाही,” असं सिद्धार्थ मेनन म्हणाला.

दरम्यान, सिद्धार्थ मेनन हा मराठीसह हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने एकुलती एक या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘पोपट’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘स्लॅमबुक’ आणि ‘राजवाडे अँड सन्स,’ ‘जून, ‘पोश्टर गर्ल’ यांसारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे.

Web Title: actor siddharth menon was about to-play-mc-sher-character-in-ranveer-singh-starrer-gully-boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.