अभिनेता साकिब सलीम 'मखना' सिनेमात बनणार तापसीचा 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 11:57 IST2017-04-08T06:27:26+5:302017-04-08T11:57:26+5:30

अभिनेता साकिब सलीमने आपल्या सिनेमातून  अभिनयाचा  ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला आहे. लवकरच आता तो एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Actor Shakib Salim 'makhana' will be made in the film 'hero' | अभिनेता साकिब सलीम 'मखना' सिनेमात बनणार तापसीचा 'हिरो'

अभिनेता साकिब सलीम 'मखना' सिनेमात बनणार तापसीचा 'हिरो'

िनेता साकिब सलीमने आपल्या सिनेमातून  अभिनयाचा  ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला आहे. लवकरच आता तो एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तापसी पन्नुचा आगामी 'मखना' सिनेमात कॉमेडी भूमिकेत दिसणार आहे. इतकेच नाहीतर या सिनेमात तो तापसीच्या हिरोची भूमिका निभावणार असल्यामुळे त्याचे स्वप्नपूर्ण झाल्याचे तो सांगतो. प्रत्येक कलाकराला आपणही रूपेरी पडद्यावर एक हिरो म्हणून झळकावे अशी इच्छा असते त्यानुसार त्याला ही भूमिका मिळताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिल्याचे त्याने सांगितले. सध्या सिनेमाचे शूटिंग सूरु असून हा सिनेमा रसिकांच्या भेटीला कधी येईल याची उत्सुकता साकिबला लागलीय. साकिब हा मुळचा दिल्लीचा असून त्याचे वडील दिल्लीत एक रेस्टॉरंट चालवतात.हे रेस्टाँरंटमध्ये मिळणा-या डेलिशिअस फुडमुळे खूप लोकप्रिय बनले आहे. दिल्लीतील या रेस्टाँरंटची शाखा मुंबईतही असावी अशी साकिबची इच्छा आहे.त्यानुसार मुबंईत तो एका चांगल्या ठिकणाच्या शोधात आहे.त्यामुळे अभिनयासह व्यवसायातही त्याला रस असल्यामुळे इतर कलाकरांप्रमाणे मुंबईत एक व्यावसायिक म्हणून नाव स्थापित करण्याच्या तो तयारीत आहे.त्यामुळे वडीलांसोबतही काम करता येणार त्यामुळे तो खूप खुश आहे. तापसी पन्नूने ‘बेबी’सिनेमात केलेल्या अभिनयामुळे तिला सिनेमांची लॉटरीच लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.त्यानंतर तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पिंक’ चित्रपट करायला मिळाला.ती आता लवकरच एका रोमँटिक-कॉमेडी ‘मखना’ चित्रपटात दिसणार आहे.सिनेमातील  तिचा फर्स्ट लुक नुकताच लॉन्च करण्यात आला होता. तिच्या या लूकलाही चांगल्या प्रतिक्रीया येत असल्यामुळे सिनेमातली माझी भूमिकाही रसिकांच्या पसंतीस उतरेन अशी आशा तिने व्यक्त केली आहे.याअगोदर तिने शानच्या ‘तुम हो तो लगता हैं’ या म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. तर साकिब सलीमने 'मेरे डॅड की मारुती','बॉम्बे टॉकीज','हवा हवाई','ढिश्शुम' सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे आता मुख्य भूमिकेत झळकण्यासाठी साकिब सज्ज झाला आहे. 

Web Title: Actor Shakib Salim 'makhana' will be made in the film 'hero'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.