रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा, पहा त्याचा हा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 18:52 IST2019-02-19T18:51:31+5:302019-02-19T18:52:56+5:30
अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा, पहा त्याचा हा Video
अभिनेता रितेश देशमुखनेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या आहे. महाराजांप्रती आदर व्यक्त करत रितेशने त्यांचे मनमोहक रुप कॅनव्हॉसवर साकारले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून हा एक विश्वास आहे. हा एक विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी माणसामध्ये जगलाच पाहिजे, असे त्याने व्हिडिओत म्हटले आहे.
रितेशने सोशल मीडियावर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला की, ‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. जगभरातल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून हा एक विश्वास आहे. हा एक विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी माणसामध्ये जगलाच पाहिजे. जय हिंद.. जय महाराष्ट्र..’
रितेश लवकरच शिवाजी महाराजांवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून दिग्दर्शक रवी जाधव हा ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.