हा अभिनेता आहे देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 12:50 IST2017-12-22T07:17:26+5:302017-12-22T12:50:37+5:30

नुकतीच फोर्ब्ज भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींच्या नावाची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता ...

This actor is the richest celebrity in the country | हा अभिनेता आहे देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रेटी

हा अभिनेता आहे देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रेटी

कतीच फोर्ब्ज भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींच्या नावाची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तर सगळ्यांनाच असते. भारतातील सगळ्यात श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत याही वर्षी सलमान खानने अव्वल स्थान पटकावले आहे.   



फोर्ब्जच्या यादीकडे जगभरातील सर्व सेलिब्रेटी आणि बिझनेसमनचे लक्ष लागलेले असते. सलमान खाननंतर या यादीत शाहरुख खान, विराट कोहली, अक्षय कुमार यांच्या नावाचा समावेश पहिल्या दहा श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत आहे. प्रियांका चोप्राचा नावाचा समावेश ही या यादीत आहे.  2017मध्ये देखील फोर्ब्जच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर सलमान खानचेच नाव होते. 

ALSO READ  :  OMG! ​सलमान खानला मिळाली कंगना राणौतचा सूड उगवण्याची आयती संधी!!

आज सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. .  १४० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना धमाकेदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. ‘सुल्तान’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता.  चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘एक था टायगर’ हा चित्रपट स्पाय थ्रिलर होता, परंतु त्यास दोन गुप्तहेरांची प्रेम कथा अशा स्वरूपात दाखविण्यात आले होते. आता ‘टायगर जिंदा है’ भारतीय नर्सोच्या रेस्क्यू आॅपरेशनच्या सत्य कथेवर आधारित आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कॅट आणि सलमान एकत्र झळकणार असल्याने त्यांच्यातील लव्ह केमेस्ट्री बघण्यास प्रेक्षक आतुर आहेत. कॅट यात जोया नावाची व्य्कतिरेखा साकारते आहे.   जोयाचा अवतार खूपच डॅशिंग दिसेल यात शंका नाही. एका मुलाखती दरम्यान अली अब्बास म्हणाला होता की कॅटरिनाने या चित्रपटाला होकार दिला नसता तर कदाचित हा चित्रपट बनलाच नसता. पुढे तो म्हणाला, या चित्रपटासाठी कॅटने प्रचंड मेहनत घेतली आहे. कॅटरिना या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. कॅटरिनाने अ‍ॅक्शन सीन्स करण्यासाठी खास ट्रेनिंगही घेतले होते. 
 

Web Title: This actor is the richest celebrity in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.