२५ वर्षांपासून गायब आहे हा सुपरस्टार, वेड्याच्या इस्पितळातून झालेला बेपत्ता, लेक पाहतेय आजही वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:19 IST2025-07-25T12:19:12+5:302025-07-25T12:19:48+5:30

Raj Kiran : एकेकाळी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे राज किरण तीन दशकांपूर्वी अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाले. त्यांच्या गायब होण्यामागे अनेक कथा समोर आल्या.

Actor Raj Kiran has been missing for 25 years, he disappeared from a mental hospital, his mother is still waiting for him | २५ वर्षांपासून गायब आहे हा सुपरस्टार, वेड्याच्या इस्पितळातून झालेला बेपत्ता, लेक पाहतेय आजही वाट

२५ वर्षांपासून गायब आहे हा सुपरस्टार, वेड्याच्या इस्पितळातून झालेला बेपत्ता, लेक पाहतेय आजही वाट

'कर्ज' आणि 'अर्थ' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःचे नाव कमावणारा अभिनेता अचानक विस्मृतीत हरवला. आता त्याची मुलगी तिच्या ग्लॅमरस फोटो आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. आम्ही प्रसिद्ध अभिनेता राज किरण (Raj Kiran) यांची मुलगी ऋषिका मेहतानी(Rishika Mahtani)बद्दल बोलत आहोत. वडील वर्षानुवर्षे बेपत्ता असले तरी आता त्याची मुलगी खूप चर्चेत आहे.

राज किरण यांचं नाव ऐकताच ८० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील काही क्लासिक चित्रपट आठवतात. एकेकाळी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे राज किरण तीन दशकांपूर्वी अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाले. त्यांच्या गायब होण्यामागे अनेक कथा समोर आल्या. असे म्हटले जात होते की या अभिनेत्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, ज्यामुळे ते नैराश्यात गेले. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ते अचानक तिथून गायब झाले आणि २० वर्षांहून अधिक काळ ते बेपत्ता आहेत. सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्यांना अमेरिकेतील वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेते ऋषी कपूर यांनी स्वतः एकदा असा दावा केला होता की त्यांना अटलांटाच्या भेटीदरम्यान राज किरण सापडले होते.

अशा चर्चा होत राहिल्या
या अभिनेत्याने आयुष्यातील अनेक वर्षे मुंबईतील भायखळा मानसिक रुग्णालयात घालवली, परंतु त्यानंतर ते अचानक तिथून गायब झाले आणि त्याच्याबद्दल तर्कवितर्क बांधले जाऊ लागले. काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवताना दिसला होता. दीप्ती नवल म्हणाल्या होत्या की, कोणीतरी त्याला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून पाहिले आहे, परंतु तिलाही पूर्णपणे खात्री नव्हती. त्यांची जवळची मैत्रीण आणि सहकलाकार दीप्ती नवल आणि अभिनेता ऋषी कपूर यांनीही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की त्यांनी राज किरणच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणतीही स्पष्ट किंवा ठोस माहिती मिळू शकली नाही. १९९९ पासून राज किरणच्या नेमक्या प्रकृतीबद्दल कोणाकडेही विश्वसनीय माहिती नाही. त्यांचे बेपत्ता होणे हे अजूनही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानले जाते.

ऋषिका काय करते?
ऋषिकाने तिच्या वडिलांप्रमाणे रुपेरी पडद्यावर आपली ओळख निर्माण केली नसली तरी, तिने तिच्या शैली आणि आत्मविश्वासाने डिजिटल जगात स्वतःचे नाव कमावले आहे. ऋषिका महतानी ही एक यशस्वी उद्योजक आहे आणि ऋषीफाइन नावाच्या प्रीमियम ज्वेलरी ब्रँडची संस्थापक आणि मालक आहे. तिचे ग्लॅमर आणि बिझनेस सेन्स सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येते. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

Web Title: Actor Raj Kiran has been missing for 25 years, he disappeared from a mental hospital, his mother is still waiting for him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.