मुकुल देवच्या निधनावरुन कमेंट करणाऱ्यांना राहुल देवचं उत्तर; म्हणाला, "हे लोक आता समोर आलेत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:30 IST2025-06-16T15:29:51+5:302025-06-16T15:30:32+5:30

मुकुलचा सख्खा भाऊ अभिनेता राहुल देवने भावाच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे. 

actor rahul dev reveals reason behind brother mukul dev s sudden demise | मुकुल देवच्या निधनावरुन कमेंट करणाऱ्यांना राहुल देवचं उत्तर; म्हणाला, "हे लोक आता समोर आलेत..."

मुकुल देवच्या निधनावरुन कमेंट करणाऱ्यांना राहुल देवचं उत्तर; म्हणाला, "हे लोक आता समोर आलेत..."

'सन ऑफ सरदार' फेम अभिनेता मुकुल देवचं (Mukul Dev) काही दिवसांपूर्वीच निधन झालं. वयाच्या ५४ व्या वर्षी दिल्लीत त्याने अखेरचा श्वास घेतला. निधनाआधी मुकुलचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यात तो वाढलेलं वजन, सुजलेला चेहरा अशा लूकमध्ये होता. तेव्हाच अनेकांनी त्याच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली होती. आता मुकुलचा सख्खा भाऊ अभिनेता राहुल देवने (Rahul Dev)भावाच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे. 

'ईटाइम्स'शी बोलताना अभिनेता राहुल देव म्हणाला, "मुकुल आठ दिवस आयसीयूत होता. डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार मुकुलच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नव्हत्या. यामुळेच  त्याचं निधन झालं. तसंच चार-पाच दिवस त्याने जेवणंच बंद केलं होतं. त्याला एकटेपणा वाटत होता. त्याची जगण्याची इच्छाच संपली होती. त्याने कामाच्या अनेक ऑफर्सही नाकारल्या. आता त्याचे सर्व अंत्यविधी झाल्यानंतर मला या सगळ्याची जाणीव होत आहे. तो याहून अधिक दु:खातून जात होता."

तो पुढे म्हणाला, "मुकुल २०१९ मध्ये वडिलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीत शिफ्ट झाला होता. त्याच वर्षी वडिलांचं निधन झालं. २०२३ साली आईही गेली. मुकुलला त्याच्या लेकीची खूप आठवण यायची. त्याने स्वत:च्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष केलं. तो नैराश्यात गेला होता."

भावाच्या निधनावर लोकांच्या कमेंट्स पाहून राहुल म्हणाला, "जे लोक आज बोलत आहेत ते मुकुलच्या संपर्कातही नव्हते. मुकुल अनफिट होता असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र तो हाफ मॅरेथॉन धावला होता. त्याचं वजन वाढलं होतं हे खरं आहे कारण तो स्वत:ची योग्य काळजी घेत नव्हता. २०१९ ते २०२४ मध्ये त्याच्या संपर्कात कोण होतं? हीच लोक त्याला रुग्णालयात भेटायला आली का?"

Web Title: actor rahul dev reveals reason behind brother mukul dev s sudden demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.