धक्कादायक! 'छिछोरे' सिनेमातील अभिनेत्याचा भीषण अपघात, हात आणि पायाला मल्टिपल फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:47 IST2024-07-18T11:46:44+5:302024-07-18T11:47:13+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या 'छिछोरे' सिनेमातील कलाकाराचा भीषण अपघात झाला आहे (sushant singh rajput)

actor naveen polishetty face major accident his hand and leg multiple fracture chhichhore movie | धक्कादायक! 'छिछोरे' सिनेमातील अभिनेत्याचा भीषण अपघात, हात आणि पायाला मल्टिपल फ्रॅक्चर

धक्कादायक! 'छिछोरे' सिनेमातील अभिनेत्याचा भीषण अपघात, हात आणि पायाला मल्टिपल फ्रॅक्चर

सुशांत सिंग राजपूतचा 'छिछोरे' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील अभिनेत्याचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेता नवीन पोलिशेट्टी असं या अभिनेत्याचं नाव आहे. अपघात इतका जबरदस्त होता की नवीनच्या हात आणि पाय यात फ्रॅक्चर झालाय. नवीनने बुधवारी १७ जुलैला स्वतः या अपघाताची बातमी चाहत्यांना सांगितली. 

नवीन अपघात झाल्यानंतर काय म्हणाला?

नवीनने सुशांत सिंग राजपूतसोबत 'छिछोरे' सिनेमात काम केलं होतं. अपघात झाल्यानंतर नवीन म्हणाला, "दुर्दैवाने माझ्या हाताला मल्टिपल फ्रॅक्चर झालं असून पायाला इजा झालीय. सध्या हा काळ माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात सक्रीय होईल अशी मला आशा आहे. या काळात तुमचं प्रेम, सहकार्य हे माझ्यासाठी मोठं औषध आहे."

नवीनने शेवटी चाहत्यांना केलं आवाहन

नवीनने त्याच्या पोस्टमध्ये दुखापत कशी झाली आणि कधी झाली याविषयी अपडेट दिले नाहीत. नवीनला दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्यासाठी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे नवीनने सध्या संयम ठेवलाय. अशातच नवीनचे काही फॅन पेजेस त्याच्या अपघातासंबंधी उलटसुलट बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे फेक न्यूजपासून सावध राहा, मी माझ्या प्रकृतीविषयी अपडेट स्वतः देईल, असं आवाहन नवीनने त्याच्या चाहत्यांना केलंय. नवीन त्याच्या आगामी प्रोजेक्टसंदर्भातील घोषणा लवकरच करेल.

Web Title: actor naveen polishetty face major accident his hand and leg multiple fracture chhichhore movie