भोजपुरी सिनेमाबद्दल अभिनेत्री मोनालिसाचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 10:14 IST2017-08-08T04:44:02+5:302017-08-08T10:14:02+5:30

भोजपुरीची आघाडीची अभिनेत्री मोनालिसा हिला बरीच लोकप्रीयता मिळाली. पण बोटावर मोजता येणारे कलाकार सोडले तर अद्यापही भोजपुरीच्या अनेक कलाकारांना ...

Actor Monalisa's big disclosure about Bhojpuri cinema! | भोजपुरी सिनेमाबद्दल अभिनेत्री मोनालिसाचा मोठा खुलासा!

भोजपुरी सिनेमाबद्दल अभिनेत्री मोनालिसाचा मोठा खुलासा!

जपुरीची आघाडीची अभिनेत्री मोनालिसा हिला बरीच लोकप्रीयता मिळाली. पण बोटावर मोजता येणारे कलाकार सोडले तर अद्यापही भोजपुरीच्या अनेक कलाकारांना हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. केवळ भोजपुरी कलाकारच नाही तर भोजपुरी चित्रपटांनाही हवी तशी प्रशंसा मिळाली नाही. भोजपुरी चित्रपटांना कमी लेखले जाते, हे एक कटू सत्य आहे. पण शेवटी भोजपुरी चित्रपटांना कमी लेखण्यामागची कारणे काय? अभिनेत्री मोनालिसा हिने याचे उत्तर दिले आहे. तिच्या मते, भोजपुरी सिनेमांचे कमी बजेट कदाचित हे यामागचे कारण आहे.



भोजपुरी चित्रपटांचा बजेट खूप कमी असतो. आम्हाला मल्टीप्लेक्सचे प्रेक्षक मिळू शकत नाहीत. केवळ सिंगल स्क्रिनवर आमचे चित्रपट रिलीज होतात. विशिष्ट लोकच ते पाहायला जातात. विशेषत: समाजाच्या खालच्या स्तराचे लोक आमचे चित्रपट पाहायला जातात. त्यामुळेच भोजपुरी चित्रपटांच्या वाट्याला प्रशंसेपेक्षा तुच्छताच अधिक येते, असे मोनालिसा एका मुलाखतीत म्हणाली. अर्थात असे असले तरी याच भोजपुरी सिनेमांनी मला अपार यश दिले आहे, असेही मोनालिसाने सांगितले. मी भोजपुरी सिनेमात येऊन जवळपास सात-आठ वर्षे झाली आहेत. या आठ वर्षांच्या काळात भोजपुरी सिनेमा बराच बदलला आहे. आमची चित्रपटसृष्टी हळूहळू प्रगती करते आहे. मी आज जे काही आहे, ते भोजपुरी सिनेमांमुळेच, असे ती म्हणाली. बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न  मोनालिसाला विचारण्यात आला. यावर तिने शानदार उत्तर दिले. आम्ही कलाकार आहोत आणि प्रत्येक कलाकाराला काम हवे आहे. मग ते बॉलिवूडमध्ये असो वा प्रादेशिक भाषेत. मला केवळ काम हवे आहे, असे उत्तर तिने दिले.

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास आहे. २००८ मध्ये ‘भोेले शंकर’ या भोजपुरी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

Web Title: Actor Monalisa's big disclosure about Bhojpuri cinema!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.