वयाच्या सत्तरीत अभिनेत्यानं थाटला चौथा संसार, दोघांच्या वयात आहे ३० वर्षांचं अंतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:28 IST2025-07-16T17:28:07+5:302025-07-16T17:28:28+5:30
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याने वयाच्या ७० व्या वर्षी चौथं लग्न करून सर्वांना चकित केले होते.

वयाच्या सत्तरीत अभिनेत्यानं थाटला चौथा संसार, दोघांच्या वयात आहे ३० वर्षांचं अंतर
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी (Kabir Bedi) यांनी वयाच्या ७० व्या वर्षी लग्न करून सर्वांना चकित केले होते. कबीर बेदींनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केले. मुलगी पूजा बेदी(Pooja Bedi)ने या नात्याला खूप विरोध केला होता. परंतु ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी तीन अयशस्वी लग्नांनंतर चौथ्यांदा लग्न केले. कबीर बेदींच्या चौथ्या पत्नीचे नाव परवीन दुसांज (Parveen Dusanj) आहे.
बॉलिवूड शादी डॉट कॉमच्या वृत्तानुसार, कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांची पहिली भेट २००५ मध्ये लंडनमध्ये एका नाटकादरम्यान झाली होती. परवीन दुसांज कबीर यांचे नाटक पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर ती कबीर बेदींना भेटली आणि त्यांच्याशी बोलताना ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. मग त्यांच्यात मैत्री सुरू झाली आणि सुमारे ३० वर्षांच्या वयाच्या फरक असूनही, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
पूजा बेदी वडिलांवर झालेली खूप नाराज
बॉलिवूड शादी डॉट कॉमनुसार, कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीची तिच्या वडिलांच्या परवीन दुसांजसोबतच्या नात्याला पसंती नव्हती. विशेष म्हणजे कबीर बेदी यांची पत्नी परवीन दुसांज ही त्यांची मुलगी पूजापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. हे सर्व असूनही, कबीर आणि परवीन दुसांज सार्वजनिकरित्या एकत्र दिसू लागले आणि त्यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूलही केलं. दोघांनी १० वर्षे एकमेकांना डेट केले. अखेर, वयोमर्यादेकडे दुर्लक्ष करून कबीरच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त लग्न केले. त्यांच्या लग्नाला मित्रमंडळी उपस्थित होत्या पण कबीर बेदी यांची मुलगी पूजा तिच्या वडिलांच्या चौथ्या लग्नामुळे खूप नाराज होती. तिने ट्विट करून आपला रागही व्यक्त केला. मात्र, आता सर्व काही ठीक आहे आणि कबीर बेदीचे त्यांची मुलगी पूजासोबतचे नातेही सुधारले आहे. त्याच वेळी, ते त्यांची चौथी पत्नी परवीन दुसांजसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.
कबीर बेदींची पहिली पत्नी कोण होती?
बॉलिवूड शादीच्या वृत्तानुसार, कबीर बेदी यांचे पहिले लग्न १९६९ मध्ये मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा गुप्ता यांच्याशी झाले होते. जेव्हा दोघे भेटले तेव्हा प्रोतिमा गुप्ता आधीच स्टार होती आणि कबीर तिच्या प्रेमात वेडा झाला. त्यांचे पालक त्यांच्या नात्याविरुद्ध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले. कबीर आणि प्रोतिमा यांना पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी ही दोन मुले होती. त्यांचे नाते चढ-उतारांनी भरलेले होते, परंतु ते त्यांच्या मुलांसाठी ते सांभाळू इच्छित होते. मात्र, १९७७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
कबीर बेदींची दुसरी आणि तिसरी पत्नी कोण होती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रोतिमापासून वेगळे झाल्यानंतर, कबीर बेदी यांनी प्रेमाला आणखी एक संधी दिली आणि १९८० मध्ये त्यांची भेट ब्रिटिश वंशाची फॅशन डिझायनर सुझान हम्फ्रीसशी झाली. ही भेट त्यांची पत्नी प्रोतिमापासून घटस्फोट आणि प्रवीणशी ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच झाली. त्या काळात सुझान मॉडेलिंगसाठी अमेरिकेत होती. दोघांमध्ये प्रेम कसे झाले याबद्दल फारशी माहिती नाही. पण कबीर आणि सुझानचे लग्न झाले आणि १९८१ मध्ये त्यांना मुलगा एडम बेदी झाला, जो मॉडेलिंग करतो. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात दोघे वेगळे झाले आणि १९९० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सुझान हम्फ्रीजशी घटस्फोट झाल्यानंतर, कबीर १९९१ मध्ये लंडनमध्ये प्रसिद्ध बीबीसी रेडिओ प्रस्तुतकर्ता निक्की मूलगावकरला भेटले. निक्की कबीरपेक्षा २० वर्षांनी लहान होती, पण वयाचा त्यांना कधीट फरक पडला नाही आणि त्या दोघांनी लग्न केले. निक्की आणि कबीर यांचे लाँग डिस्टन्स लग्न सांभाळू शकले नाहीत आणि २००५ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.