अभिनेता इंदर कुमारचे हृदविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:19 IST2017-07-28T06:39:59+5:302017-07-28T13:19:14+5:30

अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि अभिनेता इंदरकुमार याचं निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४५व्या वर्षी चार बंगला ...

Actor Inder Kumar passed away due to cardiac arrest | अभिनेता इंदर कुमारचे हृदविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेता इंदर कुमारचे हृदविकाराच्या झटक्याने निधन

िनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि अभिनेता इंदरकुमार याचं निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४५व्या वर्षी चार बंगला इथल्या निवासस्थानी त्याने अखेरचा श्वास घेतला. ९०च्या दशकात इंदर कुमारनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 20 हून अधिक सिनेमात इंदरकुमारनं आपल्या अभिनयाची झलक दाखवली.  अभिनेता अक्षय कुमारच्या खिलाडियों का खिलाडी सिनेमात त्यानं काम केलं. मात्र त्याची खास जोडी जमली ती त्याचा मित्र सलमान खानसोबत. तुमको ना भूल पायेंगे, वॉन्टेड अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. सध्या इंदरकुमार त्याच्या आगामी 'फटी पडीं हैं यार' या सिनेमाच्या शुटिंगममध्ये व्यस्त होता. या सिनेमात इंदर कुमारसोबत कॉमेडियन सुनील पालचीही भूमिका होती. 

'मासूम' सिनेमातून इंदर कुमारनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. प्रमुख अभिनेत्याच्या भूमिका इंदर कुमारच्या फारशा वाट्याला आल्या नाहीत. मात्र सहकलाकाराच्या भूमिकांना त्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला.सलमानचा मित्र असल्याने त्याची सलमानसह चांगली जोडी जमली. 'वॉन्टेड' सिनेमात त्याने सलमानच्या भावाची साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली. याशिवाय कहीं प्यार न हो जायें सिनेमातील राहुल पुगलिया ही भूमिकाही त्याने साकारली. 'तुमको ना भूल पायेंगे' सिनेमात त्याने इंदर सक्सेना ही भूमिका साकारली. याशिवाय 'कुवाँरा','गजगामिनी', 'तिरछी टोपीवाले', 'माँ तुझे सलाम', 'हथियार', 'यें दूरियाँ' अशा सिनेमांमधल्या इंदर कुमारच्या भूमिका विशेष ठरल्या. सिनेमासह छोट्या पडद्यावरही इंदर कुमारनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. 'फिअर फाईल्स' आणि 'क्यों की साँस भी कभी बहू थी' या मालिकेत इंदर कुमारने मिहिर वीरानी ही  भूमिका साकारली होती.

इंदर कुमारच्या पार्थिवावर दुपारी ४ वा यारी रोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Actor Inder Kumar passed away due to cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.