अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:59 IST2025-11-10T16:59:02+5:302025-11-10T16:59:55+5:30
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल नुकतंच त्यांच्या टीमने अपडेट दिलं आहे.

अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वीच धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटवर ठेवलं असल्याचीही बातमी आली. या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला. ते लवकर बरे व्हावे म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान धर्मेंद्र यांच्या टीमकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट आलं आहे.
धर्मेंद्र यांच्या टीमने 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार, "धर्मेंद्र हे डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. मात्र चिंता करण्याची काहीही गरज नाही." यासोबतच त्यांच्या टीमने धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना याक्षणी प्रायव्हसी द्यावी अशी विनंती केली आहे. अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात हजर आहे. तसंच त्यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेहून बोलवण्यात आलं आहे.
धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बातम्यांचं टीमने खंडन केलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. त्यामुळे चाहते धर्मेंद्र यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.
यावर्षी एप्रिल महिन्यातच धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. एका डोळ्यात धुसरपणा जाणवत असल्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. याशिवाय मोतीबिंदूचंही ऑपरेशन झालं होतं. नंतर ते पुन्हा नव्या दमाने कॅमेऱ्यासमोर आले होते.