खलनायकाच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याने दिला नकार!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 17:59 IST2019-12-29T17:58:23+5:302019-12-29T17:59:08+5:30

सुदीपने तामिळनाडूतील एका चित्रपटातील खलनायकाची ऑफर नाकारली. ‘दबंग ३’ चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद पाहता सुदीपला आता खलनायकाची भूमिका साकारायला भीती वाटतेय. 

The actor denied the villain's role !! | खलनायकाच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याने दिला नकार!!

खलनायकाच्या भूमिकेला ‘या’ अभिनेत्याने दिला नकार!!

साऊथ स्टार अभिनेता सुदिप खिच्ची याने अलीकडेच ‘दबंग ३’ चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावली आहे. बालीची भूमिका त्याने अत्यंत प्रभावीपणे साकारली, ज्यामुळे चुलबूल पांडे याचे जीवनच संपूर्णपणे बदलून गेले. मात्र, आता असं कळतंय की, सुदीपने तामिळनाडूतील एका चित्रपटातील खलनायकाची ऑफर नाकारली. ‘दबंग ३’ चित्रपटाला मिळालेला कमी प्रतिसाद पाहता सुदीपला आता खलनायकाची भूमिका साकारायला भीती वाटतेय. 

 ‘मनाडु’ ही पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात सुदिप खिच्चा हा अभिनेता सिम्बू आणि दिग्दर्शक व्यंकट प्रभु  यांच्यासोबत काम करू शकणार होता. या चित्रपटात सुदिप दिसणार म्हणून त्याचे फॅन्स खुप खुश होते. नंतर या चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते. कारण सिम्बूचे निर्माता सुरेश कामाचीसोबत भांडण झाले होते. आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. पुढील वर्षापर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. या चित्रपटाला आता सुदीपने नकार कळवला आहे. 

दबंग ३ ला मिळालेला कमी प्रतिसाद पाहता सुदीप आता कुठलाही प्रोजेक्ट स्विकारताना खलनायकाची भूमिका घेण्यास घाबरतो आहे. ‘दबंग ३’ चित्रपटावर ‘गुड न्युज’ चित्रपटाच्या कमाईचा परिणाम होताना दिसतोय. 
 

Web Title: The actor denied the villain's role !!