एका दशकानंतर बॉलिवूडचा 'हा' अभिनेता करणार कुटुंबासोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन, म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:41 IST2020-12-21T17:36:00+5:302020-12-21T17:41:08+5:30
कलाकारांना आपल्या शूटिंगमुळे आपल्या कुटुंबासोबत फार वेळ घालवता येत नाही. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा जवळपास एक दशकानंतर आपल्या कुटुंबासमवेत ...

एका दशकानंतर बॉलिवूडचा 'हा' अभिनेता करणार कुटुंबासोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन, म्हणाला..
कलाकारांना आपल्या शूटिंगमुळे आपल्या कुटुंबासोबत फार वेळ घालवता येत नाही. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा जवळपास एक दशकानंतर आपल्या कुटुंबासमवेत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणार आहे. अभिषेक कपूरच्या 'चंदीगड करे आशिकी' च्या शूटिंगनिमित्त सध्या तो चंदीगडमध्येच आहे आणि त्याच्यासाठी ही गोष्ट फार आनंदाची आहे. आयुषमान म्हणतो की, तो बर्याच दिवसानंतर कुटुंबासोबत सेलिब्रेशन करणार आहे.
आयुषमान म्हणाला, “मी माझ्या कुटुंबासमवेत चंदीगडमध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन जवळपास एक दशक उलटून गेले. मी लक्की आहे की या वेळी त्याच्यासमवेत ख्रिसमस आणि नवीन वर्षे सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली आहे.
'चंदीगड करे आशिकी' सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करतो आहे.या चित्रपटात वाणी कपूरसुद्धा आहेत. आयुषमान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याने कठोर ट्रेनिंग घेतलं आहे. अभिषेक कपूर सिनेमात वाणी कपूरला कास्ट केल्याचं सांगत म्हणाला की, 'वाणी एक कमिटेड अभिनेत्री आहे. तसेच मी आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूरसोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी उत्साहीत आहे. ही जोडी सुद्धा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे'.