काय सांगता! अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:21 IST2023-10-19T13:09:29+5:302023-10-19T13:21:10+5:30
अर्जुनच्या हातातील मोबाईल स्क्रिनवर असलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

काय सांगता! अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो
अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan)ला घटस्फोट दिल्यानंतर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत रिलेशनशीपमध्ये आली. वयाच्या अंतरामुळे त्यांच्या नात्याचीही खूप चर्चा झाली. मलायका ४९ आणि अर्जुन कपूर ३७ वर्षांचा आहे. अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या अफेअरला बरीच वर्षे झाली आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात आणि त्यांच्या प्रेमावर मोकळेपणाने चर्चा करतात. आता अर्जुनचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
अर्जुनचा एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर विमानतळ्यावर दिसतोय. अर्जुन काही चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसतोय. यादरम्यान अर्जुनच्या हातातील मोबाईल स्क्रिनवर असलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अर्जुनच्या मोबाईल स्क्रिनवर त्याचा किंवा मलायकाचा फोटो असेल असे अनेकांना वाटलं असेल पण तसं नाहीय.
विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओ अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रिनवर आई मोना शौरी कपूर यांचा फोटो आहे. अर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळ होता.आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’ असा टॅटू गोंदवला आहे. अर्जुन आणि अंशुला यांची आई मोना कपूर ही बोनी कपूर यांची पहिली पत्नी होती. 25 मार्च 2012 रोजी मोना यांचं निधन झालं.