बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना; बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:30 IST2021-12-29T14:27:39+5:302021-12-29T14:30:51+5:30

Arjun Kapoor corona positive : अर्जुन कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा (Malaika Arora) हिचीही टेस्ट होणार आहे. मलायका व अर्जुन अलीकडे करिश्मा कपूरच्या घरी झालेल्या  ख्रिसमस पार्टीत दिसले होते.

actor arjun kapoor and anshula kapoor tested coronavirus positive | बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना; बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह 

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना; बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह 

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पटीने वाढताना दिसतेय. गेल्या सात दिवसांत मुंबईतील कोरोना (corona )रूग्णांच्या संख्येत सातपटीने वाढ झाली आहे. बॉलिवूडमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसतेय. काही दिवसांआधी करिना कपूर (Kareena Kapoor), अमृता अरोरा, सीमा खान, मेहर कपूर या चौघी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या होत्या. आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची बहीण अंशुला  (Anshula) या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
अर्जुनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तो पॉझिटीव्ह आढळला होता.

रिपोर्ट पॉझिटीव्ह येताच अंशुला व अर्जुन क्वारंटाईन झाले आहेत. अनिल कपूरची लेक रिया कपूर  (Rhea Kapoor) आणि तिचा पती करण बुलानी  (Karan Boolani) या दोघांनीही कोरोनाची लागण झाल्याचे कळतेय. करिना व अमृताची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती, तेव्हा रिया कपूरच्या नावाचीही चर्चा झाली होती. रिया कपूरच्या घरी एक पार्टी झाली होती आणि या पार्टीला करिना व अमृता हजर होत्या. करिना व अमृता पॉझिटीव्ह आल्यानंतर रियाने टेस्ट केली होती. मात्र तेव्हा ती निगेटीव्ह आली होती. पण यावेळी तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

मलायकाचीही होणार टेस्ट
अर्जुन कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा (Malaika Arora) हिचीही टेस्ट होणार आहे. मलायका व अर्जुन अलीकडे करिश्मा कपूरच्या घरी झालेल्या  ख्रिसमस पार्टीत दिसले होते. या पार्टीला करिना व अमृतानेही हजेरी लावली होती. कोरोना निगेटीव्ह होताच, करिना व अमृता पार्टीला पोहोचल्या होत्या.

रणवीर शौरीच्या मुलालाही कोरोना
अभिनेता रणवीर शौरीचा मुलगा हारून याचीही कोरोना टेस्टही पॉझिटीव्ह आली आहे. शौरीने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.

Web Title: actor arjun kapoor and anshula kapoor tested coronavirus positive