'नखरेवाली'मधून अभिनेता अंश दुग्गल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, शूटिंगला केली सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 18:11 IST2023-10-21T18:11:28+5:302023-10-21T18:11:41+5:30
Ansh Duggal : दिग्दर्शक आनंद एल राय यांचा नवाकोरा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात अंश दुग्गल हा नवा चेहरा झळकणार आहे.

'नखरेवाली'मधून अभिनेता अंश दुग्गल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, शूटिंगला केली सुरूवात
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स साठी ओळखले जातात लवकरच ते नखरेवाली हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अंश दुग्गलची या रोमांचक प्रोजेक्ट् साठी मुख्य स्टार म्हणून निवड केली आहे. हा चित्रपट राहुल शांकल्या दिग्दर्शित करणार असून आजपासून त्याच्या चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा करणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण एंटरटेनर बनण्याचे वचन तर देतो आहे ज्यात भावनांची भरभराट आहे जी भारतभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल. चित्रपटाच्या थीमची एक झलक या व्हिडिओ मधून प्रेक्षकांना दिसणार आहे.
अभिनेता अंश दुग्गल याने या चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "आनंद सर आणि आमचे दिग्दर्शक राहुल शंकल्य यांच्यासोबत माझ्या अभिनयात पदार्पण केल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. हे खरोखर एक स्वप्न पूर्ण झाले आहे आणि मी खूप आनंदी आहे. या अविश्वसनीय प्रवासाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आज माझ्या आयुष्यातील एका रोमांचक अध्यायाची सुरुवात आहे "