झोपेची अॅक्टिंग करताना खरोखरच गाढ झोपी गेले महानायक अमिताभ बच्चन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 19:56 IST2017-08-01T14:26:19+5:302017-08-01T19:56:19+5:30
महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘०२ नॉट आउट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी चित्रपटातील एक झोपण्याचा ...
.jpg)
झोपेची अॅक्टिंग करताना खरोखरच गाढ झोपी गेले महानायक अमिताभ बच्चन!
म ानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘०२ नॉट आउट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी चित्रपटातील एक झोपण्याचा सीन शूट केला. मात्र हा सीन शूट करताना एक गंमत झाली असून, ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला हसू आवरणे मुश्कील होईल. होय, महानायक अमिताभ बच्चन यांनी या सीनचा उल्लेख करताना मंगळवारी (दि.१) ब्लॉगवर लिहिले की, ‘झोप सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. जर झोपण्याची संधी तुम्हाला सेटवरच मिळाली तर यापेक्षा दुसरा चांगला क्षण असूच शकत नाही.’ यावेळी बिग बी यांनी एक फोटोही शेअर केला असून, ज्यामध्ये ते गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी कुर्ता, पायजामा, मोजे आणि मंकी कॅप परिधान केली आहे. यावेळी अमिताभ यांनी असेही लिहिले की, ‘सेटवरील लाइटिंग, अॅक्शन आणि शूटिंग या शब्दांमुळे खरंच झोप लागू शकते. मलादेखील खरोखरच झोप आली होती. त्यामुळे शूटिंग संपली असे म्हणून मला उठविण्यात आले.’ असेही बिग बी यांनी म्हटले आहे. या चित्रपटात अमिताभ १०२ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. तर ऋषी कपूर त्यांच्या ७५ वर्षांच्या मुलाच्या भूमिकेत आहेत. २६ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये आलेल्या ‘अजूबा’ या चित्रपटात अमिताभ आणि ऋषी यांनी एकत्र काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अॅँथोनी’, ‘नसीब’ आणि ‘कुली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
दरम्यान, बिग बी सध्या या चित्रपटाव्यतिरिक्त ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहेत. चित्रपटात ते एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असून, हा चित्रपट बिग बजेट असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ व्यतिरिक्त चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान, कॅटरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड प्रतीक्षा आहे.