‘ही’ अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात झाली होती वेडी; सुसाइड करण्याचा केला होता प्रयत्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:19 IST2017-04-19T11:49:50+5:302017-04-19T17:19:50+5:30

बॉलिवूड जगतात अभिनेता अजय देवगण असे नाव आहे, ज्याच्या नावावर शंभरपेक्षा अधिक चित्रपटांची नोंद आहे. तो एक अभिनेताच नसून ...

Actor Ajay Devgan was in love with the crazy; Trying to Suicide! | ‘ही’ अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात झाली होती वेडी; सुसाइड करण्याचा केला होता प्रयत्न!!

‘ही’ अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात झाली होती वेडी; सुसाइड करण्याचा केला होता प्रयत्न!!

लिवूड जगतात अभिनेता अजय देवगण असे नाव आहे, ज्याच्या नावावर शंभरपेक्षा अधिक चित्रपटांची नोंद आहे. तो एक अभिनेताच नसून दिग्दर्शन आणि निर्माताही बनला आहे. ‘शिवाय’ या चित्रपटात त्याने दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय अशी तिहेरी भूमिका साकारली आहे. अजयने १९९० मध्ये त्याच्या ‘फूल और कॉँटे’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटाने त्याला एवढे हिट केले की, त्याला फिल्मफेअर अवॉर्डने त्यावेळी गौरविण्यात आले. शिवाय प्रत्येक प्रोड्यूसर त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. 

त्यावेळी अजयचे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट होत होते. तर दुसरीकडे अजय ज्या अभिनेत्रीसोबत काम करीत होता, ती त्याच्या प्रेमात पडत असे. जेव्हा त्याचा ‘दिलवाले’ हा चित्रपट आला, तेव्हाही काहीसे असेच घडले. अजय आणि रवीना टंडनची जोडी प्रेक्षकांना एवढी भावली की, त्यांचा हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. चाहत्यांनी या जोडीला कमालीचे पसंती दिली. तीच रवीनाही अजयच्या प्रेमात पडली. शूटिंगदरम्यान तिने अजयवर जीव ओवाळून टाकला. 



चित्रपटात जरी अजयने वेड्याची भूमिका साकारली असली तरी, रवीना त्याच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती. दोघांमधील अफेअरच्या चर्चाही त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या. त्याचदरम्यान अजय करिश्मा कपूरसोबत ‘जिगर’ या चित्रपटात काम करीत होता. त्यावेळी करिश्मा आणि अजयमध्ये अफेअर रंगले. अजयने रवीनाला दूर सारत करिश्मासोबत आपले नाते जोडले. पुढे याच कारणामुळे रवीना डिप्रेशनमध्ये गेली. एकदा तर तिने सुसाइडदेखील करण्याचा प्रयत्न केला होता. 

त्यावेळी अजयने याविषयावर बोलताना म्हटले होते की, रवीना टंडनचे सुसाइड अटेंप्ट हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. लाइमलाइटमध्ये येण्यासाठीच ती हा सर्व खटाटोप करीत आहे. त्यावेळी अजय आणि रवीना असा वादही रंगला होता. कारण रवीनाने अजयवर आरोप लावताना म्हटले होते की, अजयने मला बरेचसे लव्ह लेटर लिहिले होते. तर अजयने रवीनावर पलटवार करताना म्हटले होते की, रवीना स्वत:च माझ्या नावाने स्वत:ला लव्ह लेटर लिहित आहे.  



पुढे हा वाद एवढा पेटला होता की, अजयने रवीनाला वेड्यांच्या डॉक्टरांची गरज असल्याचे म्हटले होते. ती माझी कधीच मैत्रीण नव्हती अन् मी तिच्यावर कधीही प्रेम केले नव्हते. ती हे सर्व काही इमॅजिन करीत असल्याचे त्याने म्हटले होते; मात्र या दोघांमधील सत्य नेमके काय होते, हे कोणालाही कळू शकले नाही. असो, पण तुम्ही इमॅजिन करा की, काजोलऐवजी रवीना अजयची पत्नी असती तर ही जोडी कशी वाटली असती?

Web Title: Actor Ajay Devgan was in love with the crazy; Trying to Suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.