सुनिल ग्रोव्हरची मिमिक्री आमिर खानला कशी वाटली? अभिनेता म्हणाला- "ती नक्कल नव्हती, तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:54 IST2026-01-05T12:46:32+5:302026-01-05T12:54:45+5:30
कपिल शर्मा शोच्या नुकत्याच एका भागात सुनिल ग्रोव्हरने आमिर खानची नक्कल केली. त्यावर आमिरने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे

सुनिल ग्रोव्हरची मिमिक्री आमिर खानला कशी वाटली? अभिनेता म्हणाला- "ती नक्कल नव्हती, तर..."
नुकतंच कपिल शर्माच्या एका भागात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे हे कलाकार सहभागी झाले होते. दोन्हीही कलाकार त्यांच्या आगामी 'तू मेंरी में तेरा, में तेरा तू मेंरी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी कपिल शर्मा शोमधील हरहुन्नरी अभिनेता सुनिल ग्रोव्हरने आमिर खानची हुबेहूब मिमिक्री केली. आमिर खानसारखा ड्रेस परिधान करुन, मोठ्या केसांवर हेअरबँड लावून सुनिल फक्त आमिरसारखा दिसलाच नाही तर त्याने 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची जबरदस्त नक्कल केली. ही मिमिक्री आमिरला कशी वाटली?
आमिर खानला सुनिलची मिमिक्री कशी वाटली?
आमिर खानने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनिलच्या मिमिक्रीबद्दल मनातील भावना शेअर केल्या. आमिर म्हणाला- "मी याला केवळ 'नक्कल' म्हणणार नाही, कारण सुनिलने साकारलेलं माझं पात्र इतकं खरं होतं की, जणू मी स्वतःलाच पडद्यावर बघत आहे असं वाटलं. मी या भागाची एक छोटी क्लिप पाहिली आणि मी इतका हसलो की माझा श्वास कोंडला होता. सुनिलने साकारलेल्या मिमिक्रीमध्ये कोणाचीही थट्टा नव्हती, तर तो पूर्णपणे निखळ आनंद होता. कदाचित मीच सर्वात जास्त जोरात हसलो असेन."
This is so hillarious 😭😭🤣🤣
— RAJ (@AamirsDevotee) January 3, 2026
Sunil Grover mimics megastar #AamirKhanpic.twitter.com/MLAQZdWEn8
अशाप्रकारे आमिरने सुनिलची प्रशंसा केली. एकूणच सुनिल ग्रोव्हर सध्या एकुलता असा कॉमेडियन आहे, जो कोणत्याही कलाकाराची हुबेहूब नक्कल करण्यास पटाईत आहे. सुनिलची मिमिक्री इतकी दर्जेदार असते की, त्यामुळे कोणीही कलाकार दुखावत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येतं. मिमिक्री करताना सुनिल त्या विशिष्ट कलाकाराच्या भूमिकांचे बारकावे अचूकपणे सादर करतो. सुनिलने केलेली सलमान खान, अमिताभ बच्चन, उदित नारायण, गुलजार यांची मिमिक्री चांगलीच गाजली आणि प्रेक्षकांनाही आवडली.