जगातील साºया संधी आत्मसात करायच्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:22 IST2016-04-24T12:11:08+5:302016-04-24T18:22:00+5:30

हे तिच्यासाठी पदार्पण असले तरी खºया अर्थाने नव्हे. गेली दीड दशके मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यानंतर वलुशा डिझुझा हे नाव ...

Acquiring such opportunities in the world | जगातील साºया संधी आत्मसात करायच्यात

जगातील साºया संधी आत्मसात करायच्यात

ong>हे तिच्यासाठी पदार्पण असले तरी खºया अर्थाने नव्हे. गेली दीड दशके मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम केल्यानंतर वलुशा डिझुझा हे नाव कॅमेºयासाठी नवे नाही. किंग खानसोबत आणि वैशाली सामंतच्या (विंचू चावला) गाण्यात अशा अनेक ठिकाणी ती चमकली आहे. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर अनेक अभिनेत्री निवृत्ती घेतात. तीन मुलांच्या जन्मानंतर वलुशाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. घटस्फोटासारखी दुर्दैवी गोष्ट मागे ठेवून ती आता पुढे जाते आहे. तिच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकतो. सीएनएक्स डिजीटलसोबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

- तू अशावेळी चित्रपटसृष्टीत आलीस, ज्यावेळी महिला बाहेर पडतात. तुझ्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून तुला ऐकत आहोत, तुला इथे येण्यास इतका वेळ का लागला?
वलूशा - खरं सांगायचे म्हणजे, हा उशीर नव्हे! मी १९ व्या वर्षी लग्न केले आणि वयाच्या २५ व्या वर्षी मला तीन मुले आहेत. तसं पाहिलं तर मी फार जुनी नाहिए. यापूर्वी माझ्या आयुष्यात जे झालं ते वाहत गेल्यामुळ झालं. लग्नानंतर माझ्या अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही आणि आयुष्याने वेगळे वळण घेतले. ही माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे. माझ्या आयुष्यातील घटनांना मी मागे टाकले आहे आणि माझ्यातील ऊर्जा नव्याने घेण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या जगात खूप संधी आहेत आणि त्या आत्मसात करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या पूर्वायुष्याची छाया पडू नये यासाठी मी प्रयत्न करते आहे.

- फॅन हा पदार्पणासाठी मोठा चित्रपट आहे. शाहरूखसोबत काम करताना तुला कसं वाटलं?
वलूशा - फॅनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास या प्रोजेक्टने मला निवडले. ज्यावेळी मी अभिनयाच्या बाबतीत शोधायला सुरुवात केली, मला कास्टींग डिरेक्टर शानू शर्माला भेटावयास सांगण्यात आले होते. तिने मला आॅडिशन देण्यास सांगितली. त्यासाठी मी तयार झाले आणि दिलीही. अगदी दोन दिवसात तिने मला परत बोलाविले आणि दिग्दर्शक मनीष शर्माला भेटण्यास सांगितले. त्याच्यासोबतही खूप छान चर्चा झाली. तथापि, मला तोपर्यंत खात्री नव्हती, की ते मला ‘फॅन’ साठी ग्राह्य धरत आहेत. मनीषने जेव्हा शाहरूखसोबत तू काम करतीयेस असं सांगितले, त्यावेळी मी शाहरून गेली होती.



- शुटींगचा पहिला दिवस कसा होता?
वलूशा - अगदी भीषण! माझ्या घरातील पायºयावर धावण्याचा हा प्रसंग होता. मी अगदी घट्ट नाईट ड्रेस परिधान केला होता आणि शाहरूखच्या बाहूत जाण्यासाठी मी धावत होते. मी खूप घाबरलेली होते. सेटवर शेकडो लोक होते. आम्हाला सेलफोन वापरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मी माझ्या मित्रांशी याबाबत बोलू शकली नाही. त्यावेळी कोणताही संवाद नव्हता. मी थेट शाहरूखच्या बाहूत उडी मारली. मला त्यावेळी संयम राखायचा होता, परंतु मला तो शॉट करताना अगदी मेल्याहून बिकट झाले होते. चांगली गोष्ट म्हणजे शाहरूख खानने हा प्रसंग संयमाने हाताळला. २ ते ३ टेकमध्ये मी आरामदायकरित्या हा शॉट दिला. जेव्हा मला खात्री पटली त्यावेळी माझे काम सुरळीतपणे सुरू झाले.

- पण तु पहिल्यांदाच शाहरूखसोबत काम करीत नव्हतीस? त्याच्यासोबत तू दोन चित्रपट केले आहेत.
वलूशा -
हो, मी ज्यावेळी १६ वर्षांची होते, त्यावेळी मी शाहरुखला भेटले होते. त्यावेळी मी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाले होते आणि तो परीक्षक होता. आमची दुसºयांदा भेट अनेक वर्षानंतर झाली, जेव्हा मी मॉडेल बनले आणि पेप्सीच्या जाहिरातीत त्याच्यासोबत काम केले. प्रल्हाद कक्कड यांनी ती जाहिरात तयार केली होती. काही वर्षानंतर ह्युंदाईच्या जाहिरातीमध्ये आम्ही सोबत काम केले होते. या बºयाच वर्षाच्या कालावधीनंतरही शाहरूखची स्मृती तल्लख आहे. त्याला साºया जाहिराती माहिती आहेत.

- तुझ्या अभिनयाबाबत मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
वलूशा -
ते अगदी भारावून गेले आहेत. त्यांच्याकडे आवडीच्या कलाकारांची यादीच आहेत, ज्यांच्यासोबत ते काम करू इच्छितात. त्यांनी फॅन हा चित्रपट आपल्या मित्रांसोबत विविध सेट्सवर पाहिलाय. त्यांची उत्सुकता आणि उत्साह यामुळे मला प्रेरणा मिळाली. मी हे करते आहे, हे पाहून मुलंही आनंदी आहेत. त्यांचा अभिमान हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे.

- समीक्षक म्हणतात, मॉडेल्स चांग़ल्या अभिनेत्री होऊ शकत नाही, किंवा देशी भूमिका त्या करू शकत नाहीत. तुला काय वाटते?
वलूशा -
मला विश्वास आहे, दीपिका, ऐश्वर्या आणि प्रियंका चोप्रा यांनी हा नियम मोडला आहे. मला खात्री आहे, मॉडेल्स थोड्याशा ताठर स्वभाच्या असतात. मी ‘फॅन’मध्ये नव्या युगाची महिला आहे. मात्र प्रत्यक्षात मी देशीही तितकीच आहे. मी नऊवारी साडीमध्ये मराठी व्हिडिओ ‘ंिवंचू’मध्ये काम केले आहे. 

Web Title: Acquiring such opportunities in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.