दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 10:43 IST2017-04-07T05:07:34+5:302017-04-07T10:43:02+5:30
कंगना रणौतच्या क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. फँटम फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्येच काम ...

दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप
क गना रणौतच्या क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. फँटम फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्येच काम करणाऱ्या महिला कर्मचारीने विकासवर हा आरोप लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.आपल्या ऑफिसमधल्या महिला कर्मचाऱ्यांशी बोलताना विकास नेहमीच शारिरीक स्पर्श करतो असे आरोप याआधी त्याच्यावर अनेक वेळा करण्यात आले होते आता पुन्हा एकदा ही बाबसमोर आली आहे.यानंतर विकासला फँटम फिल्म्समधून बाहेर काढण्यात आले आहे. विकास बहल, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधु मांटेना यांनी एकत्र येऊन फँटम फिल्म्स हे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते. विकासवर प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत गोव्यात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र आरोप करणारी महिला आपल्या प्रॉडक्शन हाऊसची नसल्याचे विकासचे म्हणणे आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विकास बहल ही घटनाघडल्यानंतर स्वत:हुन ऑफिसला जाणे बंद केले आणि त्यानंतर 28 मार्चला त्याला कंपनीकडून अधिकृतरित्या काढण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे.
विकासने मात्र या सर्व आरोपांचे खंडन करत मी अजूनही ऑफिसला जातोय आणि कंपनीच्या एचआरकडे अशी कोणतीच तक्रार आलेली नाही आहे असे त्याचे म्हणणे आहे. फँटम फिल्म्स माझ्यासाठी एक कुटुंबासारखी आहे असे तो म्हणाला. तर या कंपनीच्या इतर पार्टनर्सचे म्हणणे आहे विशालवर अनेक महिला कर्मचाऱ्यांनी असे आरोप याआधी ही लावले आहेत. पण पहिल्यांदा कोणी तरी विकासबाबत तक्रार दाखल केली आहे आणि यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत.