अभिषेक म्हणतो, आराध्याने बनारस विद्यापीठात शिकावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 10:53 IST2016-03-02T17:53:36+5:302016-03-02T10:53:36+5:30
वाराणसीतील अभिषेक बच्चनचे चाहते बुधवारी कमालीचे सुखावले. बनारस हिंदू विद्यापीठातील युवा महोत्सव ‘स्पंदन’मध्ये अभिषेकने हजेरी लावली. यावेळी अभिषेकची एक ...
.jpg)
अभिषेक म्हणतो, आराध्याने बनारस विद्यापीठात शिकावे
व राणसीतील अभिषेक बच्चनचे चाहते बुधवारी कमालीचे सुखावले. बनारस हिंदू विद्यापीठातील युवा महोत्सव ‘स्पंदन’मध्ये अभिषेकने हजेरी लावली. यावेळी अभिषेकची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. ‘स्पंदन’मधील आपल्या भाषणात अभिषेक जे बोलला ते ऐकून बनारट हिंदू विद्यापीठातील प्रत्येकाचा ऊर भरून आला. माझी मुलगी आराध्या बनारस हिंदू विद्यापीठात शिकावी, अशी माझी इच्छा असल्याचे अभिषेक यावेळी म्हणाला. या विद्यापीठाशी आपले कौटुंबिक संबंध राहिले असल्याचेही तो म्हणाला. यावेळी पत्रकारांनी अभिषेकला शत्रूघ्न सिन्हा यांनी बिग बींबाबत केलेल्या एका विधानाबाबत छेडले. अभिताभ बच्चन यांना राष्ट्रपती बनताना पाहणे माझ्यासाठी आनंददायी ठरेल, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले होते. यावर अभिषेकने ‘मेरी पिता को पिता ही रहने दो’ असे मस्त उत्तर दिले.