पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 17:04 IST2018-12-11T16:54:13+5:302018-12-11T17:04:42+5:30

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

Abhishek Bachchan's Ex Karisma Kapoor And Wife Aishwarya Rai Danced Together At Isha-Anand's Sangeet | पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स

पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स

ठळक मुद्देइशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अनेकांनी तिथे परफॉर्मन्स सादर केला. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय एकत्र डान्स करताना दिसले तर दीपिका पादुकोण चिमुकली आराध्या आणि अभिषेकसोबत डान्स करताना दिसली. 

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे काही वर्षांपूर्वी लग्न ठरले होते. त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता हे सगळ्यांना माहीत आहे. करिश्मा आणि अभिषेकने हा मैंने भी प्यार किया या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा तुटल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. आता ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत तर करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले. काहीच वर्षांत संजय आणि करिश्मा दूर झाले. पण ते दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळतात. पण नुकतेच अभिषेकची पत्नी ऐश्वर्या आणि करिश्मा कपूर यांना एकत्र नाचताना पाहण्यात आले.

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अनेकांनी तिथे परफॉर्मन्स सादर केला. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय एकत्र डान्स करताना दिसले तर दीपिका पादुकोण चिमुकली आराध्या आणि अभिषेकसोबत डान्स करताना दिसली. 

करिश्मा आणि अभिषेकचे नाते तुटल्यानंतर अभिषेकसोबत करिश्मा संपर्कात नसली तरी अभिषेकची बहिण श्वेता बच्चन नंदासोबत तिचे खूप चांगले नाते आहे. श्वेताच्या फॅशन लाईनच्या उद्घाटनाच्यावेळी करिश्मा आवर्जून उपस्थित राहिली होती. तिने त्यावेळी या इव्हेंटचे फोटो देखील तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केले होते.

श्वेताचे सासरे राजन नंदा यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या शोकसभेला देखील करिश्मा गेली होती. राजन नंदा यांची पत्नी रितू ही करिश्माची आत्या आहे. 

सोनम कपूरचा मावस भाऊ मोहित मारवाँ याच्या लग्नाला देखील करिश्मा आणि श्वेता एकत्र आले होते. त्यावेळी त्या दोघांनी एकत्र फोटो देखील काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.  

Web Title: Abhishek Bachchan's Ex Karisma Kapoor And Wife Aishwarya Rai Danced Together At Isha-Anand's Sangeet