अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याला म्हटले ‘हॅप्पीनेस’, शेअर केला पर्सनल फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 22:22 IST2017-06-23T16:52:44+5:302017-06-23T22:22:44+5:30
सध्या ज्युनिअर बच्चन परिवार सुट्या एन्जॉय करण्यासाठी विदेशात गेला आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या हे ...
अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याला म्हटले ‘हॅप्पीनेस’, शेअर केला पर्सनल फोटो!
स ्या ज्युनिअर बच्चन परिवार सुट्या एन्जॉय करण्यासाठी विदेशात गेला आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या हे तिघे सध्या विदेशात आहेत. गेल्या काही दिवसांपासून बच्चन परिवार कामात खूपच व्यस्त होता. ऐश कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बिझी होती, तर दुसरीकडे अभिषेक कामाच्या व्यापामुळे मुलीला फारसा वेळ देऊ शकत नव्हता. त्यामुळेच बच्चन परिवार मुंबईतून दूर विदेशात प्रायव्हेट टाइम एकत्र घालविण्यासाठी गेला आहे. अभिषेकने नुकताच आपल्या व्हेकेशनशी संबंधित एक फोटोही शेअर केला असून, त्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या झोक्यावर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘हॅप्पीनेस’ असे त्याने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चनने खुलासा केला होता की, तो जेपी दत्ता यांच्या आगामी ‘पलटन’मध्ये काम करणार आहे. अभिषेकने याविषयीची माहिती त्याच्या सोशल अकाउंटवरून दिली होती. यावेळी त्याने म्हटले होते की, ‘ब्रदर टू माय राइट, ब्रदर टू माय लेफ्ट! टुगेदर वुई स्टॅण्ड! टुगेदर वुई फाइट! मी या पलटनचा एक भाग आहे.’ याशिवाय दत्ता यांनीदेखील आयएएनएसला माहिती देताना म्हटले होते की, ‘आता वेळ आलेली आहे की, नवी कथा सांगितली जावी. देशाच्या इतिहासाचा एक अध्याय लोकांसमोर मांडला जावा. मी ‘पलटन’ला सादर करीत आहे. हा चित्रपट आणि त्यातील विषय माझ्या हृदयाजवळ आहे. त्यामुळे मी याकरिता खूपच उत्साही आहे.’
![]()
त्याचबरोबर आणखी एक बातमी समोर आली होती, ती म्हणजे ऐश आणि अभिषेक ही जोडी ‘गुलाब जामून’ या चित्रपटात झळकणार आहेत; मात्र या दोघांना एकत्र बघण्यासाठी ऐश-अभिच्या चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ऐशने अनिल कपूरसोबत एक चित्रपट साइन केल्याने ‘गुलाब जामून’ला विलंब होण्याची शक्यता आहे.