“अभिषेक अमिताभ इतका टॅलेंटेड नाही...”, तस्लीमा नसरीन यांच्या ट्वीटला ज्युनिअर बच्चनचं ‘कडक’ उत्तर...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 11:20 IST2022-12-23T11:19:44+5:302022-12-23T11:20:19+5:30

Abhishek Bachchan, Tasleema Nasreeen : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्रास तुलना केली जाते. आता या बापलेकाची तुलना करणाऱ्यांच्या यादीत लेखिका तस्लीमा नसरीन यांचं नावही समाविष्ट झालं आहे.

Abhishek Bachchan Reaction On Author Tasleema Nasreeen Tweet | “अभिषेक अमिताभ इतका टॅलेंटेड नाही...”, तस्लीमा नसरीन यांच्या ट्वीटला ज्युनिअर बच्चनचं ‘कडक’ उत्तर...!!

“अभिषेक अमिताभ इतका टॅलेंटेड नाही...”, तस्लीमा नसरीन यांच्या ट्वीटला ज्युनिअर बच्चनचं ‘कडक’ उत्तर...!!

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan, Tasleema Nasreeen) यांच्यात सर्रास तुलना केली जाते. ‘बाप ग्रेट आहेच, पण पोराला जमलं नाही,’ अशा आशयाची टीका अभिषेकवर सतत होताना दिसते. आता अमिताभ व अभिषेक या बापलेकाची तुलना करणाऱ्यांच्या यादीत लेखिका तस्लीमा नसरीन ( Tasleema Nasreeen) यांचं नावही समाविष्ट झालं आहे. तस्लीमा यांनी एक ट्वीट केलं आणि त्यांचं हे ट्वीट लगेच व्हायरल झालं. अभिषेकची नजरही या ट्वीटवर पडली. त्याने तस्लीमांना असं काही उत्तर दिलं की, तस्लीमांनी आपलं ट्वीट लगेच डिलीट केलं.

तस्लीमांचं ट्वीट
अमिताभ बच्चनजी आपला मुलगा अभिषेक बच्चनवर प्रचंड प्रेम करतात. आपली सगळी प्रतीभा आपल्या मुलात उतल्याचं आणि आपला मुलगा सर्वापेक्षा चांगला असल्याचं त्यांना वाटतं. अभिषेक चांगला आहेच. पण अभिषेक अमितजी इतका टॅलेंटेड आहे, असं मला मुळीच वाटत नाही,’ अशा आशयाचं ट्वीट तस्लीमा यांनी केलं.

अभिषेकने दिलं उत्तर
तस्लीमा यांच्या या ट्वीटला अभिषेकनं अगदी विनम्र शब्दांत पण कडक उत्तर दिलं. त्याने लिहिलं, ‘मॅडम, तुम्ही अगदी खरं बोललात. कोणीच त्यांच्या प्रतीभेची वा अन्य गोष्टीची बरोबरी करू शकत नाही. ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि कायम असतील. मी त्यांचा मुलगा आहे, याचा मला अभिमान आहे.’
अभिषेकचं हे ट्वीट पाहून अनेकांनी त्याला पाठींबा दिला. यानंतर काय तर तस्लिमांनी आपलं ट्वीट डिलीट केलं.

अमिताभ यांची लेकासाठी खास पोस्ट

नुकतंच अभिषेकला ‘दसवी’ या सीरिजसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा फिल्मफेअर ओटीटी अवार्ड देऊन गौरविण्यात आलं. अभिषेकच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. या पुरस्कारानंतर अमिताभ यांनी अभिषेकसाठी एक खास पोस्ट लिहिली होती. ‘माझा अभिमान, माझा आनंद... तू तुझं म्हणणं सिद्ध केलंस. तुझी खिल्ली उडवली गेली. तुझ्यावर विभत्स टीका झाली. पण आज तू धैर्य आणि संयमाने सर्वांची मनं जिंकलीस... तू बेस्ट आहे आणि बेस्टच राहशील,’अशी पोस्ट अमिताभ यांनी लेकासाठी केली होती.


 

Web Title: Abhishek Bachchan Reaction On Author Tasleema Nasreeen Tweet