‘मनमर्जियां’नंतर अभिषेक बच्चनची गाडी सुसाट! वाचा संपूर्ण बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:17 IST2018-10-30T15:16:39+5:302018-10-30T15:17:20+5:30
होय, सध्या ४ ते ५ प्रोजेक्टवर अभिषेकची चर्चा सुरू आहे आणि या सर्व प्रोजेक्टमध्ये काम करण्यास तो तयार आहे.

‘मनमर्जियां’नंतर अभिषेक बच्चनची गाडी सुसाट! वाचा संपूर्ण बातमी!!
अभिषेक बच्चनने मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मधून वापसी केली होती. या चित्रपटात अभिषेकशिवाय विकी कौशल आणि तापसी पन्नू महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. निश्चितपणे या कौतुकाने अभिषेकला एक नवी ऊर्जा दिली आहे. ‘मनमर्जियां’ची यशस्वी कमबॅकनंतर अभिषेक नव्या दमाने कामाला लागला आहे. होय, सध्या ४ ते ५ प्रोजेक्टवर अभिषेकची चर्चा सुरू आहे आणि या सर्व प्रोजेक्टमध्ये काम करण्यास तो तयार आहे. अलीकडे दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत अभिषेकने याबद्दल माहिती दिली.
अभिषेक सध्या ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा अभिषेकचा फोटो काल-परवा लीक झाला होता. सध्या तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. याशिवाय ‘हाऊसफुल 4’मध्येही तो दिसणार आहे.
अभिषेकने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या करियरचा ग्राफ चांगलाच ढासळला होता. ‘हाऊसफुल 3’ नंतर अभिषेक कुठेही दिसला नाही. या चित्रपटानंतर काहीदिवस ब्रेकवर असल्याचे त्याने सांगितले होते. पण हा ब्रेक संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. मध्यंतरी अभिषेकने चार सिनेमे साईन केल्याचीही चर्चा होती. पण ही चचार्ही निव्वळ चर्चा ठरली होती. यादरम्यान अभिषेकचा करिअर ग्राफ उंचावण्यासाठी ऐश्वर्याने सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची निवड केली असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी की खोटी ते आम्हाला ठाऊक नाही. पण अभिषेकच दिवस पालटलेत, इतके मात्र नक्की.