२५ वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेक बच्चनला मिळाला पहिला फिल्मफेअर; 'या' खास व्यक्तींना समर्पित केला पुरस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:55 IST2025-10-14T12:54:10+5:302025-10-14T12:55:54+5:30

विजेता म्हणून नाव जाहीर होताच अभिषेक स्टेजवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

Abhishek Bachchan Dedicates Filmfare Best Actor Award To Aishwarya, Aaradhya | २५ वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेक बच्चनला मिळाला पहिला फिल्मफेअर; 'या' खास व्यक्तींना समर्पित केला पुरस्कार!

२५ वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेक बच्चनला मिळाला पहिला फिल्मफेअर; 'या' खास व्यक्तींना समर्पित केला पुरस्कार!

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडला आहे. ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अभिनेता अभिषेक बच्चनला २०२४ मध्ये आलेल्या 'I Want To Talk' या चित्रपटासाठी  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विजेता म्हणून नाव जाहीर होताच अभिषेक स्टेजवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने भावनिक भाषण केलं.

अभिषेकने आपल्या भाषणात ऐश्वर्या रायचे आभार मानले. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, "या वर्षी इंडस्ट्रीमध्ये माझी २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मला आठवत नाही की मी या ट्रॉफीसाठी किती वेळा आरशासमोर माझे भाषण रिहर्सल केलंय". अभिषेकने आपला हा पुरस्कार पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना समर्पित केला. तो म्हणाला, "मला माझी स्वप्ने जगण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल मी ऐश्वर्या आणि आराध्याचा आभारी आहे. आजचा पुरस्कार त्यांच्या पाठिंब्याचे आणि त्यागाचे परिणाम आहे". ऐश्वर्या आणि आराध्यानंतर अभिषेकने हा पुरस्कार वडिल अमिताभ बच्चन यांनाही समर्पित केला. या भावनिक क्षणी अमिताभ आणि जया बच्चन यांचेही डोळे पाणावले.

ओटीटीवर कुठे पाहाल?
शूजित सरकार दिग्दर्शित 'आय वॉन्ट टू टॉक'  चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. 'I Want To Talk' या सिनेमात अभिषेक बच्चनने अर्जुन नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. सगळं चांगलं सुरू असताना अर्जुनच्या आयुष्यात एक मोठं वादळ येतं. तो एका आजाराने ग्रस्त होतो. त्याला लायरेजियल कॅन्सर होतो आणि त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. त्याच्याकडे जगण्यासाठी कमी वेळ असतो आणि करण्यासाठी खूप गोष्टी. आजाराच्या आलेल्या वादळामुळे अर्जुनचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होतं. जगण्यासाठी फक्त १०० दिवस शिल्लक असलेल्या अर्जुनची ही कहाणी हृदयाला स्पर्श करणारी आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. 
 

Web Title : अभिषेक बच्चन को 25 साल बाद पहला फिल्मफेयर, इन्हें समर्पित किया

Web Summary : अभिषेक बच्चन को 'आई वांट टू टॉक' के लिए सर्वश्रेष्ठ अभिनेता का फिल्मफेयर मिला। उन्होंने ऐश्वर्या, आराध्या और अमिताभ बच्चन को पुरस्कार समर्पित किया, और 25 साल की यात्रा में उनके समर्थन के लिए आभार व्यक्त किया। फिल्म अमेज़न प्राइम वीडियो पर उपलब्ध है।

Web Title : Abhishek Bachchan wins first Filmfare after 25 years, dedicates award

Web Summary : Abhishek Bachchan won Best Actor Filmfare for 'I Want To Talk'. He dedicated the award to Aishwarya, Aaradhya, and Amitabh Bachchan, expressing gratitude for their support during his 25-year journey. The film is available on Amazon Prime Video.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.