​अभिषेक बच्चन होणार ‘अरेस्ट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 16:06 IST2017-03-05T10:36:43+5:302017-03-05T16:06:43+5:30

अभिषेक बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांचे नाते बरेच जुने आहे. पण आता राम गोपाल वर्मा अभिषेकला ‘अरेस्ट’ करणार ...

Abhishek Bachchan to be 'Arrest' !! | ​अभिषेक बच्चन होणार ‘अरेस्ट’!!

​अभिषेक बच्चन होणार ‘अरेस्ट’!!

िषेक बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांचे नाते बरेच जुने आहे. पण आता राम गोपाल वर्मा अभिषेकला ‘अरेस्ट’ करणार आहेत. होय, राम गोपाल यांच्यामुळे अभिषेकला ‘अरेस्ट’ व्हावे लागणार आहे. थांबा...थांबा... नको तो निष्कर्ष काढण्यापुरती, आम्ही पूर्णपणे ‘फिल्मी’ मूडमध्ये आहोत, हे तुम्हाला सांगितलेच पाहिजे. म्हणजेच, आम्ही राम गोपाल वर्मांच्या नव्या चित्रपटाविषयी बोलतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘अरेस्ट’. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या आयुष्याशी मिळत्या-जुळत्या कहानीवर हा चित्रपट आधारित असेल. येत्या १० एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार असल्याचे कळतेय. मुंबईच्या काही लोकेशन्सवर केवळ २८ दिवसांत हे शूटींग पूर्ण होणार आहे. यानंतर यावर्षाच्या अखेरिस चित्रपट रिलीजसाठी तयार असेल. या चित्रपटासाठी अभिनेत्री हुमा कुरेशी हिचे नाव चर्चेत आहे. हुमाला चित्रपटाची आॅफर देण्यात आली आहे. अर्थात याबद्दल तूर्तास काहीही कन्फर्म नाही.
अभिषेक बच्चनने राम गोपाल वर्मा यांच्या ‘नाच’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर रामूंच्या ‘सरकार’ व ‘सरकार राज’मध्ये अभिषेक दिसला होता. ‘सरकार’ सीरिजचा ‘सरकार3’ लवकरच येतो आहे. यात अभिषेक नाही. पण अभिषेकचे पप्पा अर्थात मेगास्टार अमिताभ बच्चन यात दिसणार आहेत.

 ज्युनिअर बच्चनचे करिअर सध्या डामाडौल दिसतेय. कधीकाळी अभिषेकच्या करिअरने चांगला वेग घेतला होता. पण अलीकडे   अभिषेकच्या हातातले असले नसले सिनेमेही सटकू लागले आहेत. यश राज यांच्या ‘बंटी और बबली’ शिवाय ‘धूम’ सीरिजच्या तिन्ही चित्रपटात अभिषेक दिसला होता. पण आता आदित्य चोप्राच्या या दोन्ही  चित्रपटांमधून अभिषेक बच्चन बाहेर झालाय. आता ‘अरेस्ट’ अभिषेकला किती मदत करतो, ते बघूयात!

Web Title: Abhishek Bachchan to be 'Arrest' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.