अभिषेक बच्चनने फोटोग्राफर्सना ऐश्वर्या रायचे ते फोटो डिलीट करायला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 08:47 AM2017-11-09T08:47:27+5:302017-11-09T14:17:27+5:30

नुकतेच ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा एका डिनर पार्टीत एकत्र दिसले होते. या डिनर ...

Abhishek Bachchan asked the photographer Aishwarya Rai to delete those photos | अभिषेक बच्चनने फोटोग्राफर्सना ऐश्वर्या रायचे ते फोटो डिलीट करायला सांगितले

अभिषेक बच्चनने फोटोग्राफर्सना ऐश्वर्या रायचे ते फोटो डिलीट करायला सांगितले

googlenewsNext
कतेच ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा एका डिनर पार्टीत एकत्र दिसले होते. या डिनर पार्टी दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. ही पार्टी ऐश्वर्याच्या बर्थ डेनंतर मनीष मल्होत्राच्या घरी झाली होती.   



पार्टी संपल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन बाहेर आले. मनिष मल्होत्राच्या घराबाहेर मीडिया हजर होती. तोपर्यंत सगळं ठिक होत. त्यानंतर ऐश्वर्या गाडीत बसायला गेली. तिने शॉर्ट डेनिम ड्रेस घातला होता. ऐश्वर्या गाडीत बसताना फोटोग्राफर्सनी तिचे चुकीच्या अँगल्समध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली. ही बाब अभिषेकच्या लगेच लक्षात आली त्यांने लगेच फोटोग्राफरला जवळ बोलवून तो फोटो डिलीट करण्यास सांगितले. अभिषेकने फोटो डिलीट करायला सांगितल्यानंतर ऐश्वर्याचे काही फोटो व्हायरल झाले. सध्या ऐश्वर्या त्याचा आगामी चित्रपट फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 



या चित्रपटात ऐश्वर्या एका रॉकस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेजी किया रे असे आहेत. यानंतर दुसऱ्या गाण्यात ऐश्वर्या अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिसऱ्या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशन गाणं असेल.  ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांची जोडी जवळपास दोन दशकानंतर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघे 2000मध्ये आलेल्या हमारा दिल आपके पास है आणि 1999 साली सुपरहिट झालेल्या ताल चित्रपटात दिसले होते. तसेच अभिषेक आणि ऐश्वर्याचे कपल अभिमानच्या रिमेकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची तयारी दर्शवली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला तर 2010 नंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसणार आहेत. 

ALSO RAED :  ​जेव्हा ऐश्वर्या राय पुरुषांच्या प्रसाधनगृहात पोहोचली...

Web Title: Abhishek Bachchan asked the photographer Aishwarya Rai to delete those photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.