अभिषेक बच्चनसोबत 'देसी गर्ल...' गाण्यावर ऐश्वर्या रायने लगावले ठुमके, लेकीनंही दिली साथ, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:48 IST2024-12-09T14:48:18+5:302024-12-09T14:48:57+5:30
Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन 'देसी गर्ल' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या जोडप्याची मुलगी आराध्याही गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

अभिषेक बच्चनसोबत 'देसी गर्ल...' गाण्यावर ऐश्वर्या रायने लगावले ठुमके, लेकीनंही दिली साथ, व्हिडीओ व्हायरल
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे स्टार कपल चर्चेत आहे. दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याचा एका लग्न समारंभातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या जोडप्याचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ ऐश्वर्या राय बच्चनच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे, जो एका वेडिंग फंक्शनचा आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन 'देसी गर्ल' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या जोडप्याची मुलगी आराध्याही गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कपलचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या ज्या गाण्यावर डान्स करत आहेत ते 'दोस्ताना' चित्रपटातील आहे. हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. यात अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा आणि जॉन अब्राहम देखील दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला.
अभिषेकने मुलीच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली नाही का?
यापूर्वी ऐश्वर्या रायने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलगी आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये अभिषेक दिसत नव्हता. अभिषेकने पार्टीला हजेरी लावली नसल्याची चर्चा होती, पण नंतर एक व्हिडिओ समोर आला, ज्यावरून अभिषेक त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला पत्नी ऐश्वर्या रायसोबत उपस्थित होता.