न्यू इयर सेलिब्रेट करून अभिषेक-ऐश्वर्या परतले मुंबईत, एअरपोर्टवरील आराध्याचा अंदाज भावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:37 IST2025-01-04T10:36:28+5:302025-01-04T10:37:30+5:30
Abhishek Bachchan, Aishwarya Rai Bachchan And Aaradhya Bachchan : अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या नुकतेच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते.

न्यू इयर सेलिब्रेट करून अभिषेक-ऐश्वर्या परतले मुंबईत, एअरपोर्टवरील आराध्याचा अंदाज भावला
अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्यात मतभेद असल्याच्या आणि घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या, पण जेव्हा ते दोघे मुलगी आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात आणि एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले तेव्हा या चर्चांना पूर्णविराम लागला. नुकतेच अभिषेक आणि ऐश्वर्यानेही नवीन वर्ष एकत्र साजरे केले आणि आता ते मुंबईला परतले आहेत. दोघेही ४ जानेवारीला सकाळी मुंबई विमानतळावर आराध्या(Aaradhya Bachchan)सोबत दिसले होते.
यावेळी, अभिषेकने ग्रे रंगाची हुडी परिधान केली होती, तर ऐश्वर्या आणि आराध्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. ऐश्वर्या आणि आराध्या खूप आनंदी दिसत आहेत. ऐश्वर्याने पापाराझींना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. अभिषेकही हसत हसत विमानतळाबाहेर आला आणि पापाराझींचे हात जोडून स्वागत केले. विमानतळावर अभिषेकची केअरिंग स्टाईल दिसली. त्याने ऐश्वर्या आणि आराध्याला आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि नंतर तो स्वतः त्याच कारमधून घराकडे निघाले.
ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहून चाहते झाले खूश
ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूश झाले आहेत आणि व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. एकाने लिहिले आहे की, 'दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.' आणखी एका चाहत्याने सांगितले की, 'ऐश्वर्या दिवसेंदिवस अधिक सुंदर होत आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे दोघे नेहमी एकत्र होते. नजर लागायला नको.' मात्र, काही युजर्सने त्याची खिल्लीही उडवली. कुणी घटस्फोटाच्या बातमीला ऐश्वर्या आणि अभिषेकचा पीआर स्टंट म्हणत, तर कुणी म्हटलं की सलमान भाईने दोघांना फोन करून डोस दिला असावा.