पांचोली कुुटुंबियांना जिया खानच्या आईवर ठोकला अब्रुनुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 21:11 IST2016-12-23T21:11:32+5:302016-12-23T21:11:32+5:30
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि त्याच्या कुटुंबियांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आई राबिया खान हिच्या विरोधात १०० कोटी ...

पांचोली कुुटुंबियांना जिया खानच्या आईवर ठोकला अब्रुनुकसानीचा दावा
आदित्या पांचोलीच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार जिया खानची आई राबिया खान हिने न्यायालयात आपली साक्ष दिली होती, मात्र त्यानंतर देखील त्यांनी ट्विटरवरून पांचोली कुटुंबियांविरुद्ध टीका करीत आहेत. यामुळे पांचोली कुटुंबियांनी राबिया खान यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा खटला दाखल केला आहे. यावर पुढील आठवड्यात कोर्टात सुनावनी होणार आहे. जिया खानने आत्महत्या केल्यावर आदित्य पांचोली यांचा मुलगा अभिनेता सूरज पांचोली याला ताब्यात केली होती. जिया खानचे आत्महत्या प्रकरणाची सुनवाई कोर्टात होत असतानाच राबिया खान हिने टीव्ही व वर्तमानपत्रातून यासोबतच सोशल मीडियावरून सतत अपमानास्पद टीका केली होती.
अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पांचोली कुटुंबियांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, राबिया खान यांना अशा प्रकारची टीका करण्याची मानई करण्यात यावी. याचिकेनुसार ४ मार्च ते १ मे २०१४ दरम्यान पांचोली कुटुंबियांचा अपमान करणारी १८ वक्तव्ये राबिया यांनी केली आहे.
अभिनेत्री जिया खान हिने ३ जून २०१३ रोजी मुंबई येथील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अभिनेता सूरज पांचोली याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जिया व सूरज यांच्यात प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते. आता या खट्याल्याची चौकशी सीबीआय करीत आहे.