'मतांची फेरफार,पैशांची देवाण अन्…', 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतनं 'त्या' अफवेवर सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:31 IST2023-07-27T15:30:49+5:302023-07-27T15:31:13+5:30
इंडियन आयडलच्या पहिले पर्वाचा किताब गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने जिंकला. आजही तो तितकाच प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अभिजीत सावंत लाईमलाईटपासून दूर आहे.

'मतांची फेरफार,पैशांची देवाण अन्…', 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतनं 'त्या' अफवेवर सोडलं मौन
छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो इंडियन आयडॉल(Indian Idol)मध्ये सहभागी झालेले स्पर्धकांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. इंडियन आयडल स्पर्धेचे विजेते ठरलेले गायक चांगलेच लोकप्रिय झाले. इंडियन आयडलच्या पहिले पर्वाचा किताब गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant)ने जिंकला. आजही तो तितकाच प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अभिजीत सावंत लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र नुकतेच अभिजीतने त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या अफवेवर मौन सोडले आहे.
अभिजीत सावंतने एका युट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुझ्याबद्दल पसरवण्यात आलेल्या वाईट अफवा कोणती, असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, माझ्याबद्दल मी अनेक अफवा ऐकल्या आहेत. आता मला नक्की आठवत नाही. मात्र जेव्हा मी इंडियन आयडॉल जिंकलं तेव्हा अनेकांनी माझ्याबद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या होत्या. मी पैसे देऊन हा शो जिंकला, असेही म्हटले. परंतु त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती अशी होती की काही काम करायलाही पैसे नव्हते. पण तेव्हा काही लोकांनी अभिजीत सावंतकडे खूप पैसे होते. त्याने मतांची फेरफार केली आणि तो ही स्पर्धा जिंकला, अशी अफवा पसरवली होती. ही माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अफवा होती, असे अभिजीत सांगतो.
इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीत सावंतकडे बऱ्याच गाण्यांच्या ऑफर्स होत्या. मात्र मधल्या काळात त्याच्याकडे काहीच काम नव्हते. अभिजीत सावंत सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. बऱ्याचदा तो ट्रोल होतानाही दिसतो.