अभिजीत पुन्हा वादात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 19:16 IST2016-07-03T13:46:48+5:302016-07-03T19:16:48+5:30
सतत वादग्रस्त tweet करुन चर्चेत रहाणारा गायक अभिजीतने पुन्हा एकदा महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह tweet केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी ...

अभिजीत पुन्हा वादात...
सतत वादग्रस्त tweet करुन चर्चेत रहाणारा गायक अभिजीतने पुन्हा एकदा महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह tweet केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असून, हिंदू पालकांना स्वातीसाठी न्याय हवा आहे असे tweet अभिजीतने केले.
त्याने पीएमओच्या twitter हँण्डललाही हे tweet केले. अभिजीतच्या या tweetवर पत्रकार स्वाती चर्तेुवेदी यांनी आक्षेप घेतला. अभिजीत जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असून पोलिस त्याच्यावर कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न विचारला. यावर संतापलेल्या अभिजीतने महिला पत्रकारावर अत्यंत वाईट शब्दात टीकाटीप्पणी केली.
अभिजीतच्या या tweetवर अनेकांनी संताप व्यक्त करताना त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी स्वाती चर्तेुवेदी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात अभिजीतवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याआधी सलमान खानच्या सुटकेच्या निकालानंतरही अभिजीतने वादग्रस्तtweet केले होते.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}बेशर्म बुढ़िया..U not proud of Indians? Wats your breed? U sk pakis..I fk Pakis, U lick..I kick, dnt block just wait https://t.co/0BWHU60rPm— abhijeet (@abhijeetsinger) July 2, 2016