‘अब्बाजी’ तुमच्यासाठी'......

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 18:11 IST2016-07-12T12:37:18+5:302016-07-12T18:11:55+5:30

'उस्ताद अल्ला रख्खा' यांनी दिलेला संगीताचा वारसा त्यांचे पुत्र प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन आणि फझल कुरेशी सांभाळतायत. आपल्या अब्बाजींचा ...

'Abbaji' for you '...... | ‘अब्बाजी’ तुमच्यासाठी'......

‘अब्बाजी’ तुमच्यासाठी'......

'
;उस्ताद अल्ला रख्खा' यांनी दिलेला संगीताचा वारसा त्यांचे पुत्र प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन आणि फझल कुरेशी सांभाळतायत. आपल्या अब्बाजींचा अर्थात उस्ताद अल्लारख्खा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आणि संगीताचा हाच वारसा नव्या पीढीपर्यंत पोहचवावा याच उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणीफझल कुरेशी दरवर्षी एका कॉन्सर्टचं आयोजन करतात. यंदा पहिल्यांदाच मुंबईत कुरेशी यांनी 'द जर्नी कंटिन्यु' कॉन्सर्टचं आयोजन केलंय. याचनिमित्त सांगतायत खुद्द फझल कुरेशी...  
 
'गुरु' हे सदैव आपल्यासोबत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या शिकवलेल्या गोष्टीही कायम आपल्यासोबत असतात. आमच्या वडिलांची जी शिकवण आहे तीच गोष्टी, तोच वारसा चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अब्बाजींनी त्यांच्या काळात जी प्रतिष्ठा कमावलीय. त्यांचं यश दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे दरवर्षी आयोजित होणार कॉन्सर्ट. यंदाच्या कॉन्सर्टची थीम 'ड्रम्स ऑफ इंडिया' अशी असणार आहे.
 


उस्ताद अल्ला रख्खा


दरवर्षी या कॉन्सर्टच्या माध्यमातून आधीपेक्षा काही तरी चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न असतो. उस्ताद नेहमी ‘लय’ या गोष्टीला खूप मानायचे. संगीताच्या या ‘लय’मध्येच त्यांची रुची होती. त्यामुळंच दोन वर्षांपूर्वीच्या कॉन्सर्टमध्ये फ्यजु जॅझ, भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न शास्त्रीय संगीताचा मेळ घडवून आणला. त्यानुसार यंदाही भारताच्या कानाकोप-यातील सुमुधर रिदम एका व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. रिदम हा धागा पकडून वैविध्यपूर्ण भारताची झलक दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल..
 
यंदाच्या कॉन्सर्टचं आणखी एक खास आकर्षण असेल ते म्हणजे मणिपुरी पुरुष डान्स ग्रुप परफॉर्म करणार आहेत. मार्शल आर्ट, डान्स, ढोल वाजवणं आणि सोबतीने 9 वेगवेगळ्या संगीत वाद्यांचा वापर करुन ते सादरीकरण करणार आहेत.'रिदम' आणि 'लय' या गोष्टींसह शास्त्रीय, जॅझ, वेस्टर्न असे वेगवेगळ्या प्रकारचं संगीत या कॉन्सर्टच्या माध्यमातून सादर करुन संगीताची एकात्मता हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.या कान्सर्टच्या माध्यमातून संगीतप्रेमींच्या मनात अब्बाजींची आठवण कायम राहावी आणि त्यांचा समृद्ध संगीताचा वारसा सेलिब्रेट करावा हीच आमची इच्छा आहे. 

Web Title: 'Abbaji' for you '......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.