Kareena Kapoor : अब कुछ नहीं होना आंटी...; करिना कपूरने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 10:43 IST2022-09-07T10:30:09+5:302022-09-07T10:43:58+5:30

Kareena Kapoor : दोन मुलांची आई असूनही करिना एकदम फिट दिसते. अर्थात यासाठी जिममध्ये घाम गाळणं आलंच. सध्या बेबोचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...

Ab kuch nahi hona aunty Kareena Kapoor work out goes viral, gets trolled | Kareena Kapoor : अब कुछ नहीं होना आंटी...; करिना कपूरने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, झाली ट्रोल

Kareena Kapoor : अब कुछ नहीं होना आंटी...; करिना कपूरने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, झाली ट्रोल

करिना कपूर (Kareena Kapoor )तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. दोन मुलांची आई असूनही करिना एकदम फिट दिसते. अर्थात यासाठी जिममध्ये घाम गाळणं आलंच. सध्या बेबोचा वर्क आऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ करिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने तिची नणंद सोहा अली खानला टॅग केलं आहे. शिवाय यासाठी प्रेरणा देण्यासाठी तिचे आभार मानले आहेत. इन्स्पायर, बी इन्स्पायर..., असं तिने लिहिलं आहे.
व्हिडीओत कधी ती ट्रेडमिलवर धावते आहे तर कधी दुसरे व्यायाम करताना दिसतेय आणि बॅकग्राऊंडमध्ये दिलजीत दोसांजचं ‘बॉर्न टू शाइन’ हे गाणं सुरू आहे.

(साभार )

 करिनाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला. अनेकांनी तिचं कौतुक केलं पण सोबत अनेक लोकांनी तिला ट्रोलही केलं. अब कुछ नहीं होना आंटी, अशा शब्दांत एका युजरने बेबोला ट्रोल केलं. तिसऱ्या मुलाची तयारी करत आहेस का? असं एकाने लिहिलं. बेबोच्या चाहत्यांनी मात्र तिची मेहनत बघून तिचं कौतुक केलं. सो मच हार्डवर्क, ती खरचं खूप मेहनत घेत आहेस, अशा शब्दांत चाहत्यांनी तिला पाठींबा दिला.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, नुकताच तिचा ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज झाला. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली. अर्थात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. करिना सध्या हंसल मेहताच्या नव्या सिनेमाची तयारी करत आहे. याशिवाय सुजॉय  घोषच्या एका चित्रपटातून ती ओटीटीवर डेब्यू करणार आहे.

 

Web Title: Ab kuch nahi hona aunty Kareena Kapoor work out goes viral, gets trolled